गोकुळ शिरगावातील टँकर चालक कोरोना पॉझिटिव्ह....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

संबंधित चालक हा दुधाच्या टँकरवर काम करतो.तो मुंबई मध्ये जाऊन आला त्यानंतर तो काही काळ घरी होता.

कोल्हापूर - गोकुळ शिरगाव परिसरातील टँकर चालक कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे हा परिसर पूर्ण सील करण्यात आला असून संबंधित चालक ज्यांच्या संपर्कात आला त्यांचाही शोध प्रशासनाकडून सुरू आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की संबंधित चालक हा दुधाच्या टँकरवर काम करतो.तो मुंबई मध्ये जाऊन आला त्यानंतर तो काही काळ घरी होता. प्रकृती बिघडल्याने सीपीआर मध्ये 13 मे ला सर्व तपासणी करून घेतली तेव्हा त्याचा स्वॅब घेतला होता. शासकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला होता. तोपर्यंत सीपीआर रुग्णालयातच संबंधित चालकाला क्वारंटाईन केले होते. आज सकाळी त्याचा कोरोना स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबतची माहिती गोकुळ शिरगाव सरपंचांना वैद्यकीय प्रशासनाने दिली. चालकावर सीपीआर रुग्णालयातील कोरोना कक्षात उपचार सुरू झाले. तर संबंधित चालक त्याच्या गाव परिसरात कोणाच्या संपर्कात आला होता याचा शोध वैद्यकीय प्रशासनाने सुरू केला आहे. खबरदारीचा भाग म्हणून संबंधित चालक राहतात तो गोकुळ शिरगाव परिसर सील केला आहे.

वाचा - विपरीतच घडलं ! तिने सायरनचा आवाज ऐकला अन् तिच्या जिवाच झालं वाईटच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tanker driver from Gokul Shirgaon Corona Positive