कोरोनाचा कहरच : कोल्हापुरात पुन्हा 10 रुग्ण सापडले....

सकाऴ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या  आता 226 वर पोचली आहे.

कोल्हापूर  : आज सकाळपासून वाढत असलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रात्रीनंतर दोन वेळा वाढली. काही तासापूर्वी नव्याने सात पॉझिटिव्ह आल्यानंतर आता रात्री साडेनऊ वाजता पुन्हा दहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता रुग्ण संख्या 226 वर जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण शाहूवाडी तालुक्यात असून त्याची संख्या 69 इतकी आहे.

आज दिवसभरात आलेल्या 36 पॉझीटिव्ह अहवालामध्ये आजरा-1, भुदगरड-4, चंदगड-7,  गगनबावडा-2, राधानगरी-1, शाहूवाडी-15 आणि महानगरपालिका क्षेत्रात-6 असा समावेश आहे.

हेही वाचा- चंद्रकांतदादा कोरोनातही राजकारण करू नका ;  प्रकाश आबिटकरांनी मारला असा टोला...

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

आजरा- 11, भुदरगड- 22, चंदगड- 13, गडहिंग्लज- ५, गगनबावडा- 4, हातकणंगले- 1, कागल- 1, करवीर- 10, पन्हाळा- 13, राधानगरी- 35, शाहूवाडी- 69, शिरोळ- 4, नगरपरिषद क्षेत्र- 7, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-19 असे एकूण 214 आणि पुणे-1, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण 216 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या होती आता त्यामध्ये आणखी 10 ने वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या 226 वर पोहोचली आहे. नव्याने जे दहा रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत त्यांचे तालुके अद्याप जाहीर झाले नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten more corona positive patients in kolhapur