भरदिवसा महिलेच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्या लहान मुलाला घेऊन ते आयटीआय ते पाचगाव रस्त्यावरून पायी जात होत्या

कोल्हापूर - आयटीआय ते पाचगाव रस्त्यावरून सायंकाळी पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्याने हिसकावून नेले. त्यानंतर तो मोटारसायकलवरून पसार झाला. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. याबाबतची फिर्याद शिल्पा अमोल जाधव (वय 29) यांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, शिल्पा जाधव या हनुमाननगर येथे राहतात. सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्या लहान मुलाला घेऊन ते आयटीआय ते पाचगाव रस्त्यावरून पायी जात होत्या. येथील एका जनरल स्टोअर्सच्या समोरून जात होत्या. त्यावेळी तोंडाला रूमाल बांधलेला एक चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून लंपास केले. त्यानंतर तो जवळच लावलेल्या एका मोटारसायकलवरून पसार झाला. यानंतर जाधव यांनी ओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. पण त्यापूर्वी तो चोरटा धूम स्टाईलने पसार झाला होता. दरम्यान याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नाकाबंदीच्या मदतीने चोरट्याचा शोध सुरू केला. 

हे पण वाचाचांदे रस्त्यावर मृत कोंबड्या नाहीत ; पशु संवर्धन उपआयुक्त डॉ. वाय.एस.पठण

 

संशयित 30 ते 35 वयोगटातील - 
संशयित चोरटाहा अंदाजे 30 ते 35 वयाचा असून अंगात काळ्या रंगाचा हाफ शर्ट, निळ्या रंगाची जीन्स घातली होती. तो मध्यम उंचीचा असून रंगाने सावळा असून त्याचे केस बारीक होते. तसेच तो काळ्या रंगाच्या विना नंबर प्लेट असलेल्या मोटारसायकलवरून पसार झाला. अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of jewelry from a womans neck kolhapur