52 वर्षे करताहेत "ते' दुर्मिळ वस्तूंचा संग्रह

"They've been collecting rare items for 52 years
"They've been collecting rare items for 52 years

कोल्हापूर  : कोणाला कशाचा छंद असेल हे सांगता येत नाही. याचाच प्रत्यय जुना वाशी नाका परिसरातील विजयकुमार जोशी यांनी दिला आहे. त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल सहा हजार पोस्टल स्टॅंम्प, जुन्या रेल्वेचे मोनोग्राफ, पितळेच्या भातुकलीची 600 खेळणी, निरानिराळ्या आकाराच्या सजविलेल्या 80 बाटल्या, विविध आकाराचे 100 ग्लास, तीनशे बॉलपेन्स, 350 काडीपेटी, देशी-परदेशी नोटांचा संग्रह केला आहे. 

180 देशांतील नाणी-नोटांचा संग्रह करण्याचा खटाटोप करून त्यांनी आपला अनोखा छंद जपला आहे. जोशी हे आयसीआयसीआय बॅंकेत अधिकारी होते. त्यामुळे त्यांची सतत बदली होत होती. देशातल्या विविध ठिकाणी राहताना तेथील जीवनशैलीतील विविध वस्तू जमविण्याचा छंद त्यांना लागला. सलग 52 वर्षे त्यांनी हा छंद जोपासला.

2015 मध्ये ते सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांनी जमविलेल्या वस्तू एकत्र करून ठेवल्या. विविध देशांतील चलनेही गोळा केली. देशातील चलनात नसलेल्या नोटांसह तब्बल 180 देशांतील नोटा त्यांनी एकत्र केल्या. विविध गव्हर्नरच्या काळात छापलेल्या असंख्य प्रकारच्या नोटा त्यांनी संग्रही जपल्या आहेत. दुर्मिळ वस्तू गोळा करताना त्यांना मनस्वी आनंद मिळत होता. निवृत्तीनंतर संग्रह केलेल्या वस्तू व्यवस्थित ठेवण्यात त्यांनी आनंद शोधला आणि निवृत्तीनंतरचे आयुष्य आणखी रंजक बनविले आहे. 

90 देशांतील पोस्ट स्टॅंम्प संग्रही 
महात्मा गांधी यांची गेल्या वर्षी 150 वी जयंती साजरी झाली. त्यानिमित्ताने भारतासह विविध देशांनी त्यांचा फोटो असलेली पोस्टाचे स्टॅंम्पची निर्मिती करत त्यांना अभिवादन केले होते. 90 देशांतील हे पोस्ट स्टॅंम्प त्यांनी गोळा केले असून आपल्या संग्रही ठेवले आहेत. 

गेली 52 वर्षे दुर्मिळ वस्तू जमविण्याचा छंद मला लागला. बदलीमुळे मी भारतातील विविध ठिकाणी राहिलो. तेथील जीवनशैलीशी निगडीत वस्तू मी संग्रही ठेवत होतो. निवृत्तीनंतर या वस्तू मी एकत्रित करून ठेवल्या. या छंदातून मला विलक्षण आनंद मिळतो. 
- विजयकुमार जोशी 


दृष्टिक्षेप 
- जुना वाशी नाका परिसरातील विजयकुमार जोशींचा अनोख छंद 
- विविध आकाराचे 100 ग्लास 
- तीनशे बॉलपेन्स 
- जुन्या रेल्वेचे मोनोग्राफ 
- पितळेच्या भातुकलीची 600 खेळणी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com