कारागृहातील 'या' प्रकरणामुळे 'या' बंदीजनांवर झाला गुन्हा दाखल...

Three detainees were chargerd in kolhapur  kalmaba Jail kolhapur marathi news
Three detainees were chargerd in kolhapur kalmaba Jail kolhapur marathi news
Updated on

कोल्हापूर :  कळंबा मध्यवर्ती कारागृहात सापडलेल्या सीमकार्ड नसलेले मोबाईल व मोबाईलच्या बॅटऱ्यांप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत तिघां बंदीजनांवर गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद तुरुंगाधिकारी राकेश अभिमन देवरे यांनी दिली. गुन्हा दाखल झालेल्या संशयित बंदींची नावे ः परशुराम विकास शेंडगे, अंकुश कृष्णा चव्हाण आणि रवी सुखदेव साठे 
अशी आहेत.

कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके प्रशिक्षणासाठी येरवडा येथे गेले होते. त्यांच्या जागी प्रतिनियुक्तीवर असलेले दत्तात्रय गावडे यांनीही कारागृहाची झडती घेतली होती. त्यात मोबाईल, मोबाईलच्या बॅटऱ्या सापडल्या होत्या. तसेच गांजा नेण्याचा प्रयत्न झाला होता. याबाबतचे गुन्हेही जुना राजवाडा पोलिसांत दाखल झाले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेळके हे पुन्हा अधीक्षकपदी काल रुजू झाले. त्यांनी काल कारगृहाची झाडाझडती घेतली. त्यावेळी तुरुंगाधिकारी राकेश देवरे हे सर्कल क्रमांक ६ ते ८ येथे मंडल अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत होते.

दोन सीमकार्ड नसलेले मोबाईल सापडले

शेळके यांच्या आदेशानुसार देवरे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी सर्कल क्रमांक ८ मधील बरॅक क्रमांक पाचच्या बाहेरील भिंतीच्या प्लास्टरमध्ये व विभागाच्या मागील बाजूच्या सार्वजनिक शौचालयाच्या पत्र्याखाली असे दोन सीमकार्ड नसलेले मोबाईल मिळाले. तसेच प्लास्टिकच्या कॅरिबॅगमध्ये मोबाईलच्या तीन सुट्ट्या मोबाईलच्या बॅटऱ्या मिळून आल्या. या प्रकरणाची शेळके यांनी दखल घेतली.

कारागृहातील सीसीटीव्हीचा आधार

चौकशीत त्यांना मोबाईल व मोबाईच्या बॅटऱ्यामागे संशयित बंदी परशुराम शेडगे, अंकुश चव्हाण आणि न्यायालयीन बंदी रवी साठे यांचा हात असल्याचे पुढे आले. त्यानुसार तुरुगांधिकारी देवरे यांनी संशयितांविरोधात फिर्याद दिली. सीसीटीव्हीचा आधार सायबर पोलिसांच्या मदतीने आणि कारागृहातील सीसीटीव्हीचा आधार घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत संशयित शेंडगे व चव्हाण हे दोघे शिक्षा, तर साठे हा न्यायालयीन बंदी असल्याची माहिती पुढे आली असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com