दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसाने कोल्हापूरला झोडपले 

today heavy rain in kolhapur district
today heavy rain in kolhapur district

कोल्हापूर : विजांचा गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह जिल्ह्याला पावसाने आज झोडपून काढले. दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आज दुपारनंतर भात काढणी आणि मळणीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडवली. दुपारपर्यंत ऑक्‍टोबर हिट जाणवत असताना दुपारी झालेल्या पावसाने पुन्हा गारवा निर्माण केला. 

गेल्या आठवडाभर वादळी पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांची झोप उडवली आहे. भात, भुईमूग, सोयाबीनचे मोठ्याप्रमाणात नूकसान झाले. त्यामुळे पाऊस म्हटले की आता शेतकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. दरम्यान, दोन दिवसापासून कडकडीत ऊन पडल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. आज दुपानंतर अचानक ढगांचे कडाडटने सुरु झाले. बघता-बघता वीस ते पंचवीस मिनिटे मुसळधार पावसाने कोल्हापूर शहराला झोडपून काढले. दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळी मोठी घट झाली आहे. काल 9 बंधारे पाण्याखाली होते. आज सायंकाळपर्यंत 4 बंधारे पाण्याखाली आहेत. 

4 बंधारे पाण्याखाली 

राधानगरीतून 400; अलमट्टीतून 113030 क्‍युसेक विसर्ग सुरू 

राधानगरी धरणात 232.21 दलघमी पाणीसाठा 
आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरीतून 400 तर अलमट्टी धरणातून 113030 
क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 
पंचगंगा नदीवरील रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ असे चार बंधारे पाण्याखाली आहेत. 
नजिकच्या कोयना धरणात 104. 178 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 120.755 टीएमसी इतका पाणीसाठा 
आहे. 
जिल्ह्यातील धरणांमध्येपुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 98.29 दलघमी, वारणा 974.19 
दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी, कासारी 78.56 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 76.86 दलघमी, 
पाटगाव 105.24 दलघमी, चिकोत्रा 43.12 दलघमी, चित्री 53.41 दलघमी, जंगमहट्टी 34.65 दलघमी, 
घटप्रभा44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.06 दलघमी असा आहे. 
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 13.7, सुर्वे 16.6 फूट, रुई 43 फूट, 
इचलकरंजी 40.6 फूट, तेरवाड 39.6 फूट, शिरोळ 33 फूट, नृसिंहवाडी 33.9 फूट, राजापूर 20.9 फूट तर 
नजीकच्या सांगली 10.9 फूट व अंकली 13.9 फूट अशी आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com