
मंगळवारी रात्रीच्या सुमारास कोरोचीच्या माळावर शुभम कमलाकर याचा काही अज्ञात मारेकर्यांनी निर्घुणपणे खून केला होता.
हातकणंगले (कोल्हापूर) : कोरोची माळावरील चव्हाणटेकडी येथील शुभम कमलाकर खून प्रकरणाचा शिवाजीनगर पोलिसांनी 24 तासाच्या आत छडा लावला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना पट्टणकोडोली येथून अटक केली. अटक केलेल्यांपैकी अनिल पांडव, सुनील पांडव, स्वप्नील कोळी, विरेश हिरेमठ (सर्व रा. हातकणंगले) अशी संबंधितांची नावे आहेत. पूर्ववैमनस्यातून खून केल्याची कबुली आरोपींनी यावेळी दिली. आरोपींना अटक करून हातकणंगले पोलिसांच्या ताब्यात दिले.
हेही वाचा - साहेब! पावती झाली की, दंड भरलाय, शहरातूनच जाणार! ; अवजड वाहनांमळे वाहतुक कोंडी -
मंगळवारी रात्रीच्या सुमारास कोरोचीच्या माळावर शुभम कमलाकर याचा काही अज्ञात मारेकर्यांनी निर्घुणपणे खून केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपास गतिमान केला होता. विविध पोलिस पथकांच्या माध्यमातून मारेकऱ्यांचा शोध सुरू होता. शिवाजीनगर पोलिस पथकाने शुभमच्या मारेकऱ्यांना पट्टणकडोली येथून पकडले. त्यानंतर चारही आरोपींनी खून केल्याची कबुली दिली.
या कारवाईमध्ये शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद मगर, रफिक पाथरवट, उदय पाटील, प्रशांत ओतारी, प्रकाश कांबळे, महेश पाटील, अविनाश भोसले, विजय माळवदे यांनी सहभाग घेतला. याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.
संपादन - स्नेहल कदम