ब्रेकिंग - कोल्हापूरात आज पुन्हा सापडले दहा कोरोना पॉझिटिव्ह...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

पॉझिटिव्ह संख्या सायंकाळपर्यंत कदाचित वाढू शकते अशी या क्षणाची स्थिती आहे.

कोल्हापूर : कोल्हापुरात आज  दिवसभरात एकूण दहा कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 238 वर पोहोचला आहे. अजूनही जवळपास दोनशेहून अधिक अहवाल तीन लॅबरोटरीकडून टप्प्याटप्प्याने येत आहेत. त्यामुळे ही पॉझिटिव्ह संख्या सायंकाळपर्यंत कदाचित वाढू शकते अशी या क्षणाची स्थिती आहे.

हेही वाचा- मातोश्रीवर बसून मुख्यमंत्र्यांना अडचणी कशा समजणार ? त्यांनी रस्त्यावर उतरावे - चंद्रकांत पाटील -

कोल्हापुरात गेल्या तीन-चार दिवसात रुग्णसंख्या वाढतच आहेत. विशेषता मुंबईमध्ये काम करणारे अनेकजण जिल्ह्यात परतत आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या जिल्ह्यात वाढत आहे.  हे सर्व रुग्न विलगीकरण कक्षात असल्यामुळे संसर्गाचा धोका कमी आहे असे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतू रात्रीपर्यंत अनेक अहवाल येणे अपेक्षित आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्यांची धाकधूक कायम आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याचवेळात....

हेही वाचा-कोल्हापुरचा गणेशोत्सव साधेपणाने ; सकाळचे आवाहन.... - 

हेही वाचा-साडेसहाशे कोटी देणार होतो पण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: total of ten corona patients found positive during the day today in kolhapur

टॅग्स
टॉपिकस