गडमुडशिंगीत आढळले तापाचे बारा, डेंगीसदृश्‍य एक  रुग्ण

Twelve fever, a dengue-like patient
Twelve fever, a dengue-like patient

गांधीनगर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे तापाचे बारा रुग्ण आढळले असून यांपैकी एक जण डेंगीसदृश्‍य आजाराने त्रस्त आहे. दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राने जनजागृती व पाहणी सुरू केल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ आर. एम. मुल्ला यांनी दिली. 

आशा व कर्मचारी प्रत्येक भागाचा सर्वे करत असून ग्रामस्थांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शक सूचना करत आहेत. घरोघरी पाहणी सुरू असून काही ठिकाणी पाण्यात आळ्या सापडल्या आहेत. टायरमध्ये साठलेल्या पाण्यामध्ये आळ्यांची पैदास होत असल्याने टायर जाळून टाका, स्वच्छता राखा, अशी जनजागृती आरोग्य सहाय्यक एन वाय लोहार, एस. बी. म्हेत्रस व आरोग्य सेवक पी. बी. वाईंगडे यांच्यासह आशा करत आहेत. 

परिसरनिहाय आढळलेले तापाचे रुग्ण असे : आंबेडकर चौक परिसर 3, रोहिदास चौक परिसर 4, हुडा परिसर 2, दलित वसाहत परिसर 3. 

संपूर्ण गावात औषध फवारणी करण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक उपाय सर्वतोपरी सुरू आहेत. परिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी ग्रामस्थांनीही योग्य ती दक्षता घेण्याची गरज आहे.'

- आर. एन. गाढवे म्हणाले, ग्रामविकास अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com