कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्‍सिजन पुरवठ्यासाठी दोन टॅंकर भाड्याने घेणार

 Two tankers will be hired for oxygen supply in Kolhapur district
Two tankers will be hired for oxygen supply in Kolhapur district

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या कमी-जास्त होत आहे. बहुतांशी रुग्णांना ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज आहे, त्यामुळे, जिल्ह्यातील रुग्णालयांची ऑक्‍सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी तसेच, उद्योगांनाही काही प्रमाणात ऑक्‍सिजन पुरवठा करण्यासाठी पुणे येथून दोन टॅंकर ऑक्‍सिजन घेतला जाणार आहे. त्यासाठी दोन टॅंकर भाड्याने घ्यावेत, तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे तत्काळ पाठवावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली. 
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. पाटील यांनी ऑक्‍सिजन उत्पादक, पुरठादार आणि उद्योजकांसोबत बैठक घेतली. 
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ""जिल्ह्यातील ऑक्‍सिजन उत्पादक आणि पुवरठादार यांनी वैद्यकीय कारणासाठी ऑक्‍सिजन पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी जिल्ह्यात ऑक्‍सिजन पुरवठा करण्यासाठी उत्पादन तसेच पुरवठा वाढवला पाहिजे. उद्योगांना लागणाऱ्या ऑक्‍सिजनसाठी बैठक घेऊन त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी एखादा टॅंकर भाड्याने घेण्याच्या सूचनाही पाटील यांनी दिल्या.'' 
दरम्यान, पालकमंत्री श्री. पाटील यांनी पुणे येथील इनॉक्‍स, टीएनएस या ऑक्‍सिजन उत्पादक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला. कोल्हापूर येथील कंपन्यांना पुरवठा वाढविण्याबाबत त्यांनी मागणी केली. यानुसार सीपीआर रुग्णालयात 5 टन ऑक्‍सिजन देण्याचे तसेच कोल्हापूरमधील ऑक्‍सिजन पुरवठादारांना वाढीव ऑक्‍सिजन पुरविले जाईल, असे सांगितले. 
पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्ह्याची 49 टन वैद्यकीय ऑक्‍सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी दोन टॅंकर भाडे तत्त्वावर करार करावेत, तसा प्रस्ताव तत्काळ विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवावा, अशा सूचना दिल्या. 
विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी संपर्क साधून या प्रस्तावाला मान्यता देण्याची सूचना केली. यावेळी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, जितेंद्र गांधी, रणजित शहा, विश्वास पाटील, सचिन शिरगावकर, अमर तासगावे, राजेंद्र गाडवे उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com