घरपोच भाजी हवी आहे..."कॉल आॅन व्हेज' 

Vegetable sales on AAP in kolhapur
Vegetable sales on AAP in kolhapur

टेंबलाईवाडी (कोल्हापूर) - लॉकडाउनच्या काळात सायबर महाविद्यालयातील व्यवसाय व्यवस्थापन शास्त्र (एमबीए) विभागाच्या आजी, माजी विद्यार्थ्यांनी भाजी विक्रीचा एक अभिनव मार्ग शोधला. त्यांनी फेसबुकवर कॉल व्हेज हे पेज सुरू केले. या पेजच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांना भाजी घेण्याची साद घातली जाईल. एका व्हॉट्‌स ऍप क्रमांकावर आपली मागणी नोंदवून घरपोच भाजी देण्याचा हा व्यावसायिक उपक्रम आहे. या माध्यामातून रोजगारनिर्मिती, दलालांची साखळी तोडून भाजीची थेट विक्री हे उद्देश साध्य होणार आहेत. गुरुवार (ता.21) पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरवात झाली. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


सायबर महाविद्यालयातील प्रा. डॉ. राजेंद्र पारिजात आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी 2013 मध्ये "कॉल व्हेज' हे फेसबुक पेज तयार केले. यासाठी लागणारी सप्लाय चेन, वाहतूक, ग्राहक या सगळ्याचे सर्वेक्षण केले गेले; पण नंतर यातील काही विद्यार्थ्यांना नोकरीनिमित्त बाहेर गावी जावे लागले. त्यामुळे हा उपक्रम थांबला; मात्र आता लॉकडाउनमुळे भाजी विक्रीमधील अडचणी लक्षात घेऊन पुन्हा एकदा सायबरमधील आजी-माजी विद्यार्थ्यांनी "कॉल व्हेज' पेज पुन्हा नव्या रूपात बनवले. या पेजवरून ग्राहकांना मागणी नोंदवण्यासाठीचा मोबाईल क्रमांक दिला जाईल. ग्राहकांनी कागदावर स्वतःचे पूर्ण नाव, पत्ता, घराजवळील जवळपासची मोठी खूण, मोबाईल क्रमांक आणि भाजीची मागणी लिहून त्या चिठ्ठीचा फोटो दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर त्या पत्त्यावर भाजी पोहोच केली जाईल. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अशाप्रकारची मागणी घेऊन भाजी दिली जाईल. भाजी दिल्यानंतर मग ग्राहकांकडून पैसे दिले जातील (कॅश ऑन डिलिव्हरी). संजय अनुसे, स्वप्नील मिरजकर, गणेश लंबे, श्रीकांत तोडकर, रमीज मुजावर या माजी विद्यार्थ्यांचा यामध्ये सक्रिय सहभाग आहे. 

कॉल व्हेजची वैशिष्ट्ये.... 
- ताजी आणि थेट शेतातील भाजी. 
- आधी भाजी, मग पैसे. 
- भाजीचे निर्जंतुकीकरण. 
- घरपोच सेवा. 


कोरोनाचे वैश्‍विक संकट वाढत आहे. त्यामुळे पुढील काही काळ तरी याच्यासोबत जगण्याची तयारी केली पाहिजे. म्हणूनच निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टंन्सिंग याचे पालन करूनच दैनंदिन व्यवहार केले पाहिजेत. कॉल व्हेज या उपक्रमातून भाजी विक्री करताना या सर्वच गोष्टींची काळजी घेतली जाणार आहे. या माध्यमातून रोजगारनिर्मिती तर होईलच, पण शेतकरी आणि ग्राहक थेट जोडले जाणार आहेत. 

- डॉ. राजेंद्र पारिजात, असोसिएट प्रोफेसर, एमबीए विभाग, सायबर महाविद्यालय. 

रिक्षाचालकांनाही संधी 
लॉकडाउनमुळे गेले 55 दिवस रिक्षाचालकांचा व्यवसाय बंदच आहे. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा संघर्ष अधिक तीव्र झाला. या विद्यार्थ्यांनी शहरातील रिक्षाचालकांचा डाटाही संकलित केला असून, त्यात्या भागातील रिक्षाचालकांना भाजीची ने-आण करण्याचे काम मिळेल. त्यातून त्यांनाही रोजगार निर्माण होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com