'हिंदू युवतींना लव जिहादच्या जाळ्यातून वाचवण्यासाठी लव जिहाद विरोधी कायदा करा'

vishwa hindu parishad and bajrang dal protest in ichalkaranji
vishwa hindu parishad and bajrang dal protest in ichalkaranji

इचलकरंजी : लव जिहाद कायदा बंद करा, या मागणीसाठी विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाने छत्रपती शिवाजी पुतळा चौकात निदर्शने केली. घोषणा देत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. महाराष्ट्रात हिंदू युवतींना लव जिहादच्या जाळ्यातून वाचवण्यासाठी लव जिहाद विरोधी कायदा करण्याची मागणी केली. शासनाने या विरोधी कायदा न केल्यास तीव्र आंदोलनासह वेळप्रसंगी आत्मदहनाचा इशारा दिला. 

लव जिहाद कायद्यामुळे हिंदू युवतींवर होणाऱ्या अत्याचाराचा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. लव जिहाद विरोधी घोषणांचा गदारोळ करत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून संतापाच्या भावना मांडल्या. देशात विविध राज्यांत लव जिहाद प्रकारात वाढ होऊन अनेक भीषण हत्याकांड घडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात या विरोधी कठोर भूमिका शासनाने घेतली पाहिजे. लव जिहादच्या नावावर हिंदू मुलींना जाळ्यात अडकवण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. लव जिहादपुढे राज्यातील कायदे कुमकुवत ठरत असल्याने अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून विवाह करणे व जबरदस्ती धर्मांतर रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक कायदा अमलात आणावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. 


मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयात दिले. आंदोलनात किशोर मोदी, पंढरीनाथ ठाणेकर, शिवप्रसाद व्यास, बाळासाहेब ओझा, प्रवीण सामंत, संतोष हत्तीकर, विजय पाटील, दत्तात्रय पाटील, संतोष मुरदंडे, मारुती शिंगारे, अनिल देसाई, सचिन कुरूंदवाडे, दत्तात्रय पाटील, शरद बाहेती आदी सहभागी झाले होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com