कसे आहात, काय चाललयं, लक्ष असू दे ; इच्छूक उमेदवारांकडून हाक आणि विचारपूस

for voters candidate interaction with voters for election of kmc in kolhapur
for voters candidate interaction with voters for election of kmc in kolhapur

कोल्हापूर : महापालिका निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तसे इच्छुक उमेदवारांना मतदारराजा अधिक जवळचा वाटू लागला आहे. रस्त्यात कोणी दिसायचे अवकाश, काय कसे आहात, काय चाललयं, अशी चौकशी आवुर्जन केली जात आहे. 
प्रत्येक भागात काही व्यक्ती आशा आहेत की त्यांच्या शब्दाला मान आहे हे इच्छुकांना ठाऊक आहे. त्या व्यक्तीला जपले की त्याच्यासोबत किमान पाच पन्नास मते आपल्यासोबत जोडली जातात हेही त्यांना चांगले ठाऊक आहे.

हल्ली सकाळी, सायंकाळी चौकात कोणी नजरेस पडल्यानंतर तेथून इच्छुक उमेदवारांची सवारी निघाली असली की गाडी चौकाच्या कोपऱ्याला वळाली असे समजायला हरकत नाही. तेथे उभ्या असलेल्यांची चौकशी सुरू होते. काय कसे आहात, काय चाललयं अशी विचारणा होते. इच्छुक उमेदवार कधी नव्हे इतके नम्र झाले आहेत. एकेका मताला महत्त्‍व असल्याने आपल्याकडून कोणी दुखावले जाऊ नये आणि नजरेतून कोणी सुटता कामा नये याची काळजी घेतली जात आहे. 

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत इच्छुकांच्या वैयक्तीक गाठीभेटी सुरू आहेत. लक्ष असू दे, अशी विनंती केली जात आहे. मतदारराजाला कधी नव्हे ते इतके महत्त्‍व आले आहे. प्रत्येक इच्छुकाने आपल्याकडे यावे असे मतदारराजाला वाटू लागले आहे. एखाद्याचा वाढदिवस हा इच्छुकांसाठी भेटीगाठीचे निमित्त ठरू लागला आहे. पूर्वी कधी वाढदिवसाला कधी आठवण झाली नाही आत्ताच नेमकी कशी झाली असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडला आहे. एकंदरीत कार्यकर्ते आणि मतदारराजाचे महत्व कधी नव्हे इतके वाढले आहे. निवडणुकीचे दिवस जसे आणखी जवळ येईल तसे उमेदवार अधिक नम्र होत जातील.
 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com