फुटबॉल पंचांच्या मानधनावर पाणी ; पुढील हंगाम सुरू होण्याबाबत संभ्रम 

 Water on the honorarium of football umpires; Confusion about starting next season
Water on the honorarium of football umpires; Confusion about starting next season

कोल्हापूर  : कोरोनाच्या संकटाने शहरातील फुटबॉल पंचांच्या मानधनावर पाणी फिरले आहे. मार्चमध्ये बंद पडलेला हंगाम कधी सुरू होणार, याची शाश्‍वती नसल्याने ते अस्वस्थ आहेत. एका साखळी सामन्यामागचे साडेतीनशे, तर नॉक-आऊट स्पर्धेतील एका सामन्यामागचे सातशे रूपये मानधनाला त्यांना मुकावे लागत आहे. त्यासह कोल्हापूर जिल्ह्याबाहेर पंचगिरीसाठी जाणाऱ्या पंचांच्या भ्रमंतीला ब्रेक लागला आहे. 
केएसए लीग फुटबॉल स्पर्धेत छत्रपती शाहू स्टेडियमवर एकूण 56 सामने होतात. प्रत्येक सामन्यामागे साडे तीनशे रूपये मानधन पंचांना दिले जाते. कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनकडे सुमारे 78 पंच नोंदणीकृत आहेत. अनेक वर्षे मैदानावर पाय न ठेवणाऱ्या पंचांना असोसिएशनने वगळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या सुमारे पंचवीस पंच मैदानावर पंचगिरी करत आहेत. केएसएच्या वरिष्ठ गटातील प्रत्येकी एका साखळी सामन्यासाठी पंचांना 350, ब गटासाठी 300, क गटासाठी 250, तर गडहिंग्लज तालुका स्पर्धेसाठी 250 रूपये मानधन दिले जाते. ब गटात 36, क 120, तर गडहिंग्लज स्पर्धेत 30 सामने होतात. साखळीनंतर होणाऱ्या नॉक-आऊट स्पर्धेतील प्रत्येकी एका सामन्याकरिता पंचांना 700 रूपये मानधन मिळते. एका स्पर्धेत किमान पंधरा सामने, तर हंगामात पाच ते सहा स्पर्धा होतात. काही पंचांना आर्थिक खर्चासाठी फुटबॉल हंगाम आधारवड ठरतो. 
बंगळूर, मुंबई, पुणे, बेळगाव, सातारा, सांगली, मिरज, गडहिंग्लजला पंचगिरीसाठी इथल्या पंचांना बोलावले जाते. ऑल इंडियाच्या 15 व 18 वर्षाखालील स्पर्धेतही ते पंचगिरी करतात. कोरोनामुळे स्पर्धांवर मार्चमध्येच ब्रेक लागला, शिवाय सप्टेंबर उजाडूनही कोरोनाचा कहर कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. 

फुटबॉल हंगामात पंचगिरी करणे जिकिरीचे आहे. प्रेक्षकांच्या शिव्या खाऊन पंचगिरी करावी लागते. असे असले तरी फुटबॉल जिवंत राहण्यासाठी हे आव्हान पेलावे लागते. कोरोनामुळे 2019-20 चा हंगाम लवकर बंद पडला. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. पुढील हंगाम कधी सुरू होईल, हेही माहीत नाही. 
- सुनील पोवार , फुटबॉल पंच. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com