कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार

Water supply to Kolhapur city will continue
Water supply to Kolhapur city will continue

कोल्हापूर - पुराचे पाणी ओसरू लागल्यामुळे बालिंगा तसेच शिंगणापूर उपसा केंद्रे पाण्याखाली जाण्याचा धोका टळला आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.

बालिंगा केंद्रावर जुन्या शहराचा तसेच शिंगणापूर योजनेवर उपनगरे ई वॉर्ड तसेच कसबा बावड्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. नागदेववाडी येथे बालिंगा उपसा केंद्राचे उपास केंद्र आहे. १९४७ मध्ये उभारलेले केंद्र अजूनही भक्कम स्थितीत आहे. तीन दिवसांपूर्वी पुराचे पाणी आल्याने उपसा बंद पडतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. पंप पाण्याखाली जाण्यासाठी केवळ तीन फुटांचे अंतर बाकी होती. भोवतीला नदीचा परिसर आणि मध्यभागी रॉ वॉटर स्टेशन आहे. तेथून पुढे दुसरे पंपिंग स्टेशन आहे. पुलाभोवती सध्या पाणी आहे. तेथून जीव धोक्‍यात घालून पाणीपुरवठा विभागाकडील कर्मचाऱ्यांनी पंप सुरू केले. तेथील पुराच्या पाण्याची पातळी किमान एक फुटाने कमी झाली आहे. फिल्टर हाऊस ज्या ठिकाणी पाणी शुद्ध होते तेथील यंत्रणा सुरळीत आहे.

चंबुखडी येथील फिल्टर हाऊसमध्ये नागदेववाडीतून पाणी उचलले जाते. तेथे दररोज ६३ एमएलडी पाणी शुद्ध होते. डी मार्टच्या बाजूने शहरात बालिंगातंर्गत पाईपलाईनचा विस्तार झाला आहे. शिंगणापूरजवळील पंपिंग स्टेशनपर्यंत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. येथे स्टेशनच्या भोवती पुराचे पाणी आहे. गेल्यावेळी ५४८ मीटर इतक्‍या उंचीवर पंप पाण्याखाली गेले होते. आजही येथे पाण्याची पातळी ५४३ मीटरपर्यंत होती. कसबा बावड्याचे दोन पंप, तसेच अन्य तीन पंपांतून येथून २४ तास उपसा सुरू असतो.

पाण्याची पातळी कमी झाल्याने शहर पाणीपुरवठ्यास धोका नाही. गेल्या वर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने सतर्क आहोत. यावेळी उपास केंद्रे पाण्याखाली जाता जाता थोडक्‍यात वाचली. 
- भास्कर कुंभार, प्रभारी जलअभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com