आता तरी न्याय मिळेल का ..? वजीर रेस्क्यू फोर्सची व्यथा....

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत नसताना सामाजिक कार्य म्हणून सेवा बजावणाऱ्या वजीर रेस्क्यू फोर्स कशाचीही तमा न  बाळगता तालुक्यात कोरोनाच्या लढ्यात तीस जवान काम करीत आहेत.

जयसिंगपूर (कोल्हापूर) : ऑगस्टमध्ये आलेल्या प्रलयकारी महापुरात देवदूताची भूमिका बजावून अनेक लोकांचे प्राण वाचविणाऱ्या औरवाड (ता.शिरोळ) येथील वजीर रेस्क्यू फोर्स अद्यापही शासनाच्या मदतीपासून वंचित आहे. शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत नसताना सामाजिक कार्य म्हणून सेवा बजावणाऱ्या वजीर रेस्क्यू फोर्स कशाचीही तमा न  बाळगता तालुक्यात कोरोनाच्या लढ्यात तीस जवान काम करीत आहेत. आता तरी शासनाकडून न्याय मिळेल अशी आशा त्यांना आहे. 

हेही वाचा- भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना अडवू नका, पेट्रोल व डिझेल द्या ; जयंत पाटील

 महापूरात लोकांना वाचविणे, विहीरीतील ‘मृतदेह बाहेर काढणे, नदीत बुडणाऱ्यांचा शोध घेणे, आणीबाणीच्या काळात प्रत्येक गावात जावून जनजागृती करणे, नाकाबंदी करणे यासह ‘महत्वाच्या कामासाठी कोणत्याही पैशाची अपेक्षा न करता औरवाड येथील वजीर रेस्क्यू फोर्स मदतीसाठी अग्रेसर असते. महापुरात या टीमने अनेक लोकांना पाण्यातून बाहेर काढले आहे. या रेस्क्यूचे प्रमुख रजाक पटेल यांचे ‘महापुरात घर पाण्याखाली गेले तरी सुध्या लोकांच्या मदतीसाठी ते कार्यरत राहिले. व अनेक लोकांचे जीव वाचविले. यावेळी शासनाकडून त्यांना मदत देण्याची ग्वाही अनेक जणांनी दिली होती. मात्र, नंतर याकडे दुर्लक्ष करण्यात आले. 

हेही वाचा-* इचलकरंजी: एकीकडे लाॅकडाऊन तर दुसरीकडे फ्रीजमध्ये सापडले नॉक ऑऊट व टुबर्ग....*

मानधनाशिवाय एक समाजसेवा​

महापुरानंतर आता कोरोनाच्या लढ्यासाठी वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान कुरुंदवाड, औरवाड, गौरवाड, हेरवाड, तेरवाड, घोसरवाड, दत्तवाड, सैनिक टाकळी, राजापूर, खिद्रापूर, शेडशाळ आदी ठिकाणी कार्यरत आहेत. गावागावात जावून जनतेला ‘मार्गदर्शन करणे, नाकाबंदी करणे, पोलिसांना सहकार्य करणे यासह कोरोना प्रतिबंधात्मक दक्षतेसाठी वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान कोणत्याही ‘मानधनाशिवाय एक समाजसेवा म्हणून कोरोनाच्या लढ्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे या जवानांचे ‘मनोधैर्य वाढविण्यासाठी शासनाकडून त्यांना मदत ‘मिळणे गरजेचे आहे. यासाठी शिरोळ तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. 

आमचा शासकीय सेवेत समावेश करा

‘महापुराबरोबर आता कारोनाच्या लढ्यासाठी आमच्या वजीर रेस्क्यू टीमने कशाचीही तमा न बाळगता ३० जवान कार्यरत आहेत. त्यांना कोणतीही आर्थिक मंदत शासनाकडून मिळत नाही. त्यामुळे आम्हाला आपत्ती व्यवस्थापना‘ध्ये समाविष्ट करुन शासकीय सेवेत काम‘ करण्याची संधी मिळावी. अथवा आपत्ती व्यवस्थापन निधीतून आम्हाला ‘मानधनाची सोय करण्यात यावी. 

रजाक पटेल (वजीर रेस्क्यू फोर्स)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wazir Rescue Force Demands Will there be justice kolhapur marathi news