भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना अडवू नका, पेट्रोल व डिझेल द्या ; जयंत पाटील

विजय लोहार
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

लोकांना भाजीची गरज आहे ती प्रत्येक माणसाला मिळाली पाहिजे.शेतकरी यांनी गावात येऊन भाजी विकण्यास काहीच अडचण नाही गर्दी होणार नाही याबाबत काळजी घेऊन आपला माल पोहोच करावा

नेर्ले  (सांगली) : ग्रामीण भागातील शेतकरी यांना शेतीसाठी एक लिटर पेट्रोल व मुबलक हवे तेवडे डिझेल देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देऊन  भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना गावातून भाजीपाला विकण्यास अटकाव करू नका.लोकांना भाजीची गरज आहे ती प्रत्येक माणसाला मिळाली पाहिजे.शेतकरी यांनी गावात येऊन भाजी विकण्यास काहीच अडचण नाही गर्दी होणार नाही याबाबत काळजी घेऊन आपला माल पोहोच करावा असे आवाहन जलसंपदा मंत्री ना जयंतराव पाटील यांनी केले. नेर्ले येथील शेतकऱ्यांशी व निवडक लोकांशी त्यांनी संवाद साधला.

दैनंदिन जीवनावश्यक वस्तू घरात आता बसलेल्या लोकांना पोहोच होणे गरजेचे आहे.शेतीची कामे वेळेत व्हायला हवीत.त्यासाठी शेतकऱ्यांना पंपावर तेल मिळण्यासाठी ग्रामपंचायत व गाव कामगार तलाठी यांनी  पत्र देणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांना भाजीपाला देण्यापासून कोणीही रोखू नये.नको ती कामे करू नका.लोकांना वेठीस धरून तुमची कामे वाढवू नका.असा सल्ला त्यांनी ग्रामपंचायत प्रशासन ला दिला.

जबाबदारी व कामे अंगावरून झटकू नका

आपली जबाबदारी व कामे अंगावरून झटकू नयेत.भाजीपाला व अन्नधान्य वस्तू विकणाऱ्या लोकांचा छोट्या गाड्यांना आर टी ओ परवाना काय गरजेचा आहे तसेच शेतकरी शेती साठी लागणारे पेट्रोल, डिझेल देण्यात यावे  याबाबत वाळवा  प्रांत अधिकारी नागेश पाटील व जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांना फोनवरून ना जयंत पाटील यांनी  सुचना दिल्या. यावर कारवाई करावी असे आदेश दिले.

हेही वाचा- साठ कोटींचा गूळ थप्पीला

लोकांनी घरीच थांबावे बाहेर पडू नये : जयंत पाटील

स्थानिक लोकांना अडचणी निर्माण होतील असे ग्रामपंचायत व प्रशासन यंत्रनेने वागू नये.लोकांनी घरीच थांबावे बाहेर पडू नये.असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कृष्णेच्या दोन्ही संचालकांच्या  समोर शेतकरी अशोक वाठारकर यांनी आमचा सातव्या महिन्यातला ऊस अजून कृष्णा कारखान्याने का नेला नाही म्हणत कृष्णा च्या कारभाराबाबत तक्रारीचा पाढा वाचला.यावेळी मी तुमच्या तक्रारीशी सहमत आहे असे सूचक विधान केले. रेशन धान्य, ऊस शेती, पिके,पाणी व्यवस्थापन, भाजीपाला ,अत्यावश्यक वस्तू याबाबत आढावा घेण्यात आला.यावेळी आरोग्य विभागाचे डॉ सागर शिंदे,गावकामगार तलाठी पंडित चव्हाण, ग्रामविकास अधिकारी  उपस्थित होते.

हेही वाचा-कोरोनामुळे विवाह सोहळ्यावर फिरले पाणी

शेतकऱ्यांना,शेती विषयक कामे करणाऱ्या ट्रॅक्टर,मळणी मशीन,हॉर्वेस्टर,शेती साठी दुचाकी वापरणाऱ्याना ग्रामपंचायत ने पत्र द्यावे अशा सूचना करून या कामी डिझेल मुबलक मिळावे.
मंत्री जयंत पाटील

ग्रामसेवक कामाचे आहेत
अहो तुमच नाव कामाचा माणूस म्हणून आहे जास्त कामे वाढवू नका. असा सल्ला ग्रामविकास अधिकारी एम डी चव्हाण यांना दिला यावेळी चव्हाण यांनी हात जोडत वरचे सांगतील तसेच करतो असे सांगताच त्याची मंत्री जयंत पाटील यांनी वरिष्ठांना फोन करून खातरजमा केली यावर आपण खरोखरच कामाचे आहात असे म्हणत चव्हाण यांचे कौतुक केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not stop farmers selling vegetables give petrol and diesel sangli marathi news