esakal | तुम्ही कधी पिलाय का? ७५ हजार रुपये किलोचा ‘व्हाईट’ चहा
sakal

बोलून बातमी शोधा

White tea worth Rs 75 000 per kg

कंटाळा घालवण्यासाठी चहा, बैठकीत चहा, मित्रमंडळी भेटले तरीही चहा. निमित्तं कोणतेही असो चहा लागतोच.

तुम्ही कधी पिलाय का? ७५ हजार रुपये किलोचा ‘व्हाईट’ चहा

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - गल्लीतील टपरीपासून ते दिल्लीपर्यंत ‘चाय पे’ चर्चा होते. याच चहाचे प्रकार आणि त्याची उलाढाल सर्वसामान्यांना थक्क करणारी आहे. महागडा, कमी चव आणि ‘माईल्ड’ अशी  ‘व्हाईट’ चहाची खासियत आहे. सुमारे ७५ हजार रुपये किलो दराने त्याची किरकोळ विक्री होते. देशात केवळ आसाममधील एकाच टेकडीवर तो उत्पादित होत असून तेथून तो जर्मनीत पोचतो. सर्वसाधारणपणे चहाचे सहा प्रकार आहेत. गतवर्षी भारतातून सुमारे २५ कोटी किलोची निर्यात झाली आहे.

कंटाळा घालवण्यासाठी चहा, बैठकीत चहा, मित्रमंडळी भेटले तरीही चहा. निमित्तं कोणतेही असो चहा लागतोच. व्हाईट, ब्लॅक, ग्रीन, उलोंग, यलो आणि हर्बल टी असे चहाचे प्रमुख प्रकार मानले जातात. यापैकी ‘व्हाईट’ चहा सर्वात महागडा आहे. केवळ आसाममध्येच साधारण दीड ते दोन हजार किलो वार्षिक उत्पादन होणारा चहा थेट जर्मनीला जातो. ७५ हजार रुपये किलोने त्याची किरकोळ विक्री होते. दूध किंवा साखर न मिसळता तो प्यावा लागतो. त्यातून आळस कमी होतो यांसह शरीराला आवश्‍यक घटक मिळतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

‘यलो’ चहा भारतात मिळतच नाही. ‘ब्लॅक’ चहा सध्या सर्वत्र उपलब्ध आहे. चहाच्या पानांना भाजून रोल केले जाते. त्यामध्येही काही ग्राहक साखर मिसळून पितात तेही चुकीचे असल्याचे सांगतात. ‘उलोंग’ चहा चीनमधून येतो. चीनमध्ये तो आवडीचा आहे. ‘ग्रीन’ चहाचीही मागणी वाढत आहे. मात्र तोही साखर आणि दूध न मिसळता प्यावा लागतो.

हे पण वाचा - रस्त्यावर निर्जन ठिकाणी तरूणीचा विनयभंग ; पीडितेची आत्महत्या

‘हर्बल’ चहा सर्वत्र प्यायला जातो. त्यामध्ये चहाच्या पानांवर प्रक्रिया करून त्याची पावडर किंवा छोटे गोळे करतात. त्यामुळे तो काही प्रमाणात काळा होऊन कडवट लागतो. म्हणून त्यामध्ये दूध आणि साखर मिसळून पितात. तणाव कमी करण्यासाठी हर्बल चहा महत्त्वाचा ठरतो. त्यामध्ये तुळस, हळद, पुदिना, आले व इतर पदार्थ वापरून आरोग्यासाठी उपयुक्त बनवतात. त्याचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.

हे पण वाचा - खासगी भिशीसाठी धोक्‍याची घंटा, भिशी प्रमुख पळून जाण्याचे प्रकार

 
  जर्मनीत व्हाईट चहाची क्रेझ
  हर्बल चहाचाच एक प्रकार म्हणजे ‘काश्‍मिरी काहवा’
  आसाम, दार्जिलिंग आणि तमिळनाडूत चहाचे उत्पादन
  दक्षिण भारतातील निलगिरी चहा प्रसिद्ध
  निलगिरीतील चहाची चव दक्षिण भारतात आवडीची
  केवळ चहामुळे नव्हे, तर साखरेमुळे होते ॲसिडिटी
  दार्जिलिंगमधील चहा दर्जेदार आणि किमती मानतात
  आसाममध्ये सर्वाधिक चहाचे उत्पादन


संपादन - धनाजी सुर्वे