कोल्हापुरात मटणाच्या दरा नंतर आता माशांचा विषय...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

एरवी पापलेट आणि सुरमईचे ताट घ्यायचे म्हटले तरी प्रत्येकाला ते परवडणारे असतेच, असे नसते. थंडीच्या दिवसांत सी-फूटला अधिक पसंती दिली जाते.

कोल्हापूर - समुद्रातील वाऱ्यामुळे निर्माण झालेले वातावरण निवळू लागल्याने दोन दिवसांत माशांचे दर कमी होण्यास सुरवात होईल, असे मासे विक्रेत्यांकडून आज सांगण्यात आले. बुधवारच्या निमित्ताने जनरल फिश तसेच मटण मार्केटमध्ये मोठी गर्दी झाली. मात्र, पापलेटचा दर ७०० रुपये किलोच्या घरात गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.डिसेंबर तसेच जानेवारी हे दोन महिने मासा खव्वयांसाठी पर्वणीचे ठरतात. पावसाळ्यानंतर समुद्रात मासेमारीस सुरवात होते. 

समुद्रातील वादळ निवळले; वाढीव दर कमी होणार

एरवी पापलेट आणि सुरमईचे ताट घ्यायचे म्हटले तरी प्रत्येकाला ते परवडणारे असतेच, असे नसते. थंडीच्या दिवसांत सी-फूटला अधिक पसंती दिली जाते. हर्णै बंदरापासून गोवा किनारपट्टी, सिंधुदुर्ग, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातून स्थानिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मासे आवक होतात. तीन चार दिवसापासून समुद्रातील वादामुळे मासेमारी बंद होती. 
पापलेट, सुरमई, सरंगा अशा किंमती माशांचे दर अधिक वाढले. सातशे ते आठशे रूपयापर्यंत हे दर पोहचले. मोठ्या पापलेटचा दर आठशे रूपये किलोपर्यंत पोहचला. स्थानिक व्यापाऱ्यांचे कोकणात मासेमारी करणाऱ्यांशी दररोजचा संपर्क असतो. समुद्र वाऱ्याची गती कमी होण्यास सुरवात झाली असून येत्या दोन ते तीन दिवसात सातशे रूपये पोहचलेला दर पाचशे ते साडेपाचशेपर्यंत खाली येईल. दरम्यान समुद्री माशांबरोबर गोड्या पाण्यातील मासे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली.

वाचा - कशाने भारावले परदेशी पाहुणे कोल्हापुरात....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Within a two days fish rates will start to decline in kolhapur marathi news