कोल्हापूरात ग्रामपंचायत सदस्याने केला महिला सरपंचचा विनयभंग ; ती काढत होती मार्ग अन्...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

मादळे गावातील करोना बाधीत रुग्ण हा शिक्षाधिन बंदी असुन त्याची गावात राहण्याची व्यवस्था नाही.

नागाव (कोल्हापूर) : मादळे ( ता. करवीर ) येथील ग्रामपंचायत सदस्याविरुध्द विनयभंग व अनुसूचित  जाती जमाती अत्याचार प्रतिबंधीत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मादळे येथील महिला सरपंच यांनी याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. करवीर विभागाचे उप विभागीय पोलिस अधिकारी प्रशांत अमृतकर यांनी मादळे येथे  भेट देऊन याबाबत चौकशी केली. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य वसंत मारुती कोरवी यांना अटक करण्यात आली. 

हेही वाचा- साडेपाच हजार विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी -

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी :

शनिवारी रात्री दहा वाजता मादळे गावातील करोना बाधीत रुग्ण हा शिक्षाधिन बंदी असुन त्याची गावात राहण्याची व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत कोणत्या उपाययोजना करायला हव्यात याबाबत  महिला सरपंच व पदाधिकारी चर्चा करत होते.  यावेळी ग्रामपंचायत सदस्य वसंत मारुती कोरवी यांचा महिला सरपंच व त्यांचे पती यांच्यात वाद झाला. त्यानंतर कोरवी याने आपला विनयभंग केलेची फिर्याद महिला सरपंच यांनी दिली आहे.  तसेच त्या अनुसूचित जाती जमाती मधील असल्याने आरोपी विरुद्ध विनयभंगासह अनु.जाती जमाती अत्याचार प्रतिबंधीत कायद्यान्वये शिरोली पोलिस ठाणे येथे रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman sarpanch complaint at police station in kolhapur