रेल्वे प्रवाशांसाठी ! सोलापूर विभागातील 17 रेल्वे गाड्या रद्द 

तात्या लांडगे
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

  • सततच्या बदलाला प्रवाशी वैतागले 
  • 25 फेब्रुवारीपर्यंत चालणार दुहेरीकरणाचे काम 
  • कलबुर्गी- सोलापूर पॅसेंजर, अहमदाबाद चेन्नई एक्‍स्प्रेस रद्द 
  • सहा गाड्या शॉर्ट टर्मिनेट तर 17 रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल 

सोलापूर : सोलापूर विभागातील सोलापूर-वाडी सेक्‍शनमधील बोरोटी- दुधनी- कुलाली रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम 25 फेब्रुवारीपर्यंत चालणार असल्याने या मार्गावरील तब्बल 17 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सततच्या बदलामुळे रेल्वे प्रवाशी मात्र जाम वैतागल्याचे चित्र दिसून येत आहे. 

हेही नक्‍की वाचा : हालचाली सुरु...यंदाही कृत्रिम पावसाचे प्रयोग 

हैदराबाद- विजयपूर पॅसेंजर (4 मार्चपर्यंत), विजयपूर- बोलाराम पॅसेंजर (19 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत), कलबुर्गी- सोलापूर पॅसेंजर (4 मार्चपर्यंत), रायचूर- विजयपूर पॅसेंजर (19 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत), विजयपूर- रायचूर पॅसेंजर (5 मार्चपर्यंत), सोलापूर- गुंटकल डेमू व गुंटकल- कलबुर्गी डेमू, कलबुर्गी- वाडी डेमू (26 फेब्रुवारीपर्यंत), वाडी- सोलापूर डेमू (27 फेब्रुवारीपर्यंत) या गाड्यांसह एलटीटी- काकीनाडी एक्‍स्प्रेस (22 फेब्रुवारीला), काकीनाडी- एलटीटी (24 फेब्रुवारीला), चेन्नई- अहमदाबाद (20 व 23 फेब्रुवारीला), अहमदाबाद- चेन्नई एक्‍स्प्रेस (19 व 22 फेब्रुवारी) अशा 17 गाड्या 17 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तर विशाखापट्टणम- एलटीटी, एलटीटी- विशाखापट्टणम, फलुकनामा- कलबुर्गी पॅसेंजर, सोलापूर- फलुकनामा पॅसेंजर, हसन- सोलापूर एक्‍स्प्रेस, सोलापूर- हसन एक्‍स्प्रेसचा मार्ग मर्यादित करण्यात आला आहे. तसेच विशाखापट्टणम- एलटीटी एक्‍स्प्रेस, एलटीटी- विशाखापट्टणम एक्‍स्प्रेस, मुंबई- भुवनेश्‍वर एक्‍स्प्रेस, भुवनेश्‍वर- मुंबई, मुंबई- हैदराबाद हुसेनसागर एक्‍स्प्रेस, हैदराबाद- मुंबई हुसेनसागर एक्‍स्प्रेसच्या मार्गात बदल केल्याचेही रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. तसेच मुंबई- हैदराबाद, हैदराबाद- मुंबई, मुंबई- चेन्नई, पुणे- भुवनेश्‍वर एक्‍स्प्रेस, भुवनेश्‍वर- पुणे एक्‍स्प्रेस, अहमदाबाद- यशवंतपूर, यशवंतपूर- अहमदाबाद, चेन्नई- साईनगर, साईनगर- चेन्नई एक्‍स्प्रेसच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. 

हेही नक्‍की वाचा : गरोदर मातांसाठी ! कुपोषण मुक्‍तीसाठी सापडला इलाज 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 trains canceled in Solapur region