युथ प्राईड ग्रुपच्या रक्तदान शिबिरात 574 जणांनी केले रक्तदान 

YOUTH PRIDE.JPG
YOUTH PRIDE.JPG

सोलापूरः येथील युथ प्राईड ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये विक्रमी म्हणजे 574 दात्यांनी रक्तदान केले. कोरोना संकटाने निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी हे शिबिर घेण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून मोहोळचे आमदार यशवंत माने उपस्थित होते. तसेच प्रदेश कॉंग्रेस सेवादलाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दायमा, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे, एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी, नगरसेवक तौफिक शेख, नगरसेवक तौफिक हत्तुरे, नगरसेवके रियाज हुंडेकरी, जीएम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, संयोजक तथा युथ प्राईड ग्रुपचे अध्यक्ष समीर शेख यांची उपस्थिती होती. 

उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार माने म्हणाले की, मागील दहा वर्षापासून सोलापूर शहरात युथ प्राईड ग्रुपने अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. त्याचबरोबर शहरातील गरजूंना अन्नधान्य वाटप, कपडे व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. या ग्रुपने सादर केलेला प्रसिध्द देखावा देखील सोलापूरमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. दरवर्षी हे देखावे सादर केले जातात. सामाजिक कार्यासाठी आपण नेहमीच समीर शेख यांच्या पाठीशी आहोत असे आश्वासन आमदार माने यांनी दिले. 
या शिबिराच्या साठी आमदार माने यांच्यासह माजी महापौर आरिफ शेख, शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव, पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे, गटनेते चेतन नरोटे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका वैष्णवी करवळे, नगरसेवक विनोद भोसले, सकल मराठा समाज समन्वयक माऊली पवार, जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष गौरव खरात, युवककॉंग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, जॉन फुलारे, करण म्हेत्रे, बालाजी पवार, मल्लू आचलेर, हरिभाऊ घाडगे आदी उपस्थित होते. यावेळी 574 जणांनी रक्तदान केले.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com