अबब..! महापालिकेच्या 'या' कर्मचाऱ्यांकडे 92 कोटींची येणेबाकी; सभागृह नेत्यांनी व्यक्‍त केली चिंता 

तात्या लांडगे
Wednesday, 19 August 2020

श्रीनिवास करली यांनी पत्राद्वारे व्यक्‍त केली चिंता 
महापालिकेतील विविध विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांकडे एक अब्जापर्यंत येणेबाकी आहे. त्यांना वारंवार सांगूनही 2003 पासून सुमारे साडेतीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील येणेबाकी भरली नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती अडचणीची झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात महापालिकेला निधीची गरज असून येणेबाकी असलेल्या कर्मचाऱ्यांची वसुली संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांमार्फत वसुलीच कार्यवाही करावी, असे पत्र सभागृह नेता श्रीनिवास करली यांनी महापालिका आयुक्‍तांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सोलापूर : महापालिकेने त्यांच्याकडील 51 विभागांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना 2003 ते 2019 पर्यंत 243 कोटी सात लाख रुपयांचे ऍडव्हॉन्स दिले. मात्र, सद्यस्थितीत कर्मचाऱ्यांकडून महापालिकेला 92 कोटी रुपयांची येणेबाकी वसूल झालेली नाही. कर्मचाऱ्यांना अडचणीच्या काळात ऍडव्हॉन्स स्वरुपात महापालिकेने ही रक्‍कम त्यांना दिली. मात्र, खातेप्रमुखांच्या दुर्लक्षामुळे प्रलंबित रक्‍कम वसूल झालेली नाही. त्यामुळे आता प्रत्येक खातेप्रमुखांना नोटीस बजावण्यात आली असून त्यामध्ये येणेबाकी सक्‍तीने वसूल का करू नये, असे नमूद करण्यात आले आहे.

 

महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍त, उपायुक्‍त कार्यालय, सहायक आयुक्‍त, विशेष कार्यकारी अधिकारी (हद्दवाढ), कार्यालय अधिक्षक (सामान्य प्रशासन), मुख्य लेखापरीक्षक, मुख्य लेखापाल, आयुक्‍तांचे स्वीय सहायक, नगरसचिव, नगर अभियंता (विद्युत, भुमी मालमत्ता व गलिच्छ वस्ती सुधार), सार्वजनिक आरोग्य अभियंता, आरोग्याधिकारी, सफाई अधिक्षक (वाहन), सहायक संचालक (नगररचना), उद्यान, स्थानिक संस्था कर (एलबीटी), क्रिडाधिकारी, मंडई विभाग, कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी, विधान सल्लागार, व्यवस्थापक (हुतात्मा स्मृती मंदिर), अंतर्गत लेखापरीक्षक, प्रवास (ऍडव्हॉन्स), आठ विभागीय कार्यालये, परिवहन व्यवस्थापक, उर्दू कॅम्प प्रशाला, प्रकल्प संचालक, स्वच्छ भारत मिशन, कर आकारणी कर संकलन, सचिव लेप्रसी हॉस्पिटल, घनकचरा व्यवस्थापन, जनगणना अधिकारी, मनपा शिक्षण मंडळ, महिला व बालकल्याण समिती या विभागांमधील कर्मचाऱ्यांकडे मोठी येणेबाकी आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील अग्रिमची रक्‍कम भरण्याकडे कानाडोळा केल्याने आता महापालिका त्यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. 

 

श्रीनिवास करली यांनी पत्राद्वारे व्यक्‍त केली चिंता 
महापालिकेतील विविध विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांकडे एक अब्जापर्यंत येणेबाकी आहे. त्यांना वारंवार सांगूनही 2003 पासून सुमारे साडेतीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील येणेबाकी भरली नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती अडचणीची झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात महापालिकेला निधीची गरज असून येणेबाकी असलेल्या कर्मचाऱ्यांची वसुली संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांमार्फत वसुलीच कार्यवाही करावी, असे पत्र सभागृह नेता श्रीनिवास करली यांनी महापालिका आयुक्‍तांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

 

सर्वाधिक येणेबाकीचे विभाग 
विभाग                               येणेबाकी 

 • परिवहन व्यवस्थापक            37,88,42,875 
 • नगरअभियंता                      9,75,45,290 
 • सार्वजनिक आरोग्य अभियंता 28,11,62,628 
 • आरोग्याधिकारी                   5,81,94,596 
 • नगररचना (सहा.संचालक)    1,60,54,931 
 • सहायक आयुक्‍त (स.)          1,44,75,818 
 • स्वच्छ भारत मिशन              1,01,34,450 
 • आठ झोन                           1,70,45,059 
 • उद्यान                                  41,33,900 
 • विधान सल्लागार                    65,77,502 
 • एलबीटी                               32,68,198 
 • क्रीडाधिकारी                        26,84,061 
 • नगरसचिव                            17,66,348 
 • मुख्य लेखापाल                     47,46,008 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 92 crore due to solapur muncipal corporation employees House leaders expressed concern