खव्याच्या कारवाईनंतर आता मैदा, रवा, बेसनावरही लक्ष 

प्रमोद बोडके
Wednesday, 28 October 2020

अन्न प्रशासनाच्यावतीने मंगळवारी कुमठा रोडवरील वैष्णवी खवा व दूध डेअरीवर कारवाई करण्यात आली. 

सोलापूर: दिवाळी निमित्त मिठाई आणि गोड पदार्थांना अधिक मागणी असते. ग्राहक रेडिमेड मिठाई खरेदी करतात किंवा घरी मिठाई तयार करतात. सोलापूरचा अन्न प्रशासन विभाग दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अलर्ट झाला आहे. रेडिमेड मिठाईसोबतच मिठाई तयार करण्यासाठी लागणाऱ्या मैदा, रवा, बेसन, खाद्यतेल यामधील भेसळ रोखण्यासाठी अन्न प्रशासन विभाग सज्ज झाला असून त्या दृष्टीने कार्यवाही सुरू केल्याचीही माहिती अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली. 

हेही वाचाः मुंबई-पुणे-हैदराबाद हाय स्पीड रेल्वेच्या विद्युतीकरणाची होणार सुरुवात 

अन्न प्रशासनाच्यावतीने मंगळवारी कुमठा रोडवरील वैष्णवी खवा व दूध डेअरीवर कारवाई करण्यात आली. 

हेही वाचाः पाचशेच्या दंडाएैवजी पंधराचा मास्क द्या, आम आदमी पार्टीची मागणी मास्कसंबंधी जागृती 

अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे व नमुना सहाय्यक राजा स्वामी यांनी वैष्णवी डेअरीला अचानक भेट दिली. येथून त्यांनी 514 किलो खवा ताब्यात घेतला. अस्वच्छ ठिकाणी खवा साठवून ठेवण्यात आला होता. तसेच तयार केलेली मिठाई देखील जप्त करण्यात आली आहे. 

भेसळ रोखण्यासाठी कारवाई 
दिवाळीनिमित्त खव्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. खव्यातून भेसळ होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहचू शकते. कोणत्याही अन्न पदार्थांच्या भेसळीबाबत संशय आल्यास नागरिकांनी तत्काळ अन्न प्रशासनाशी संपर्क साधावा. 
- प्रदीप राऊत, सहाय्यक आयुक्त, अन्न प्रशासन  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the action of khawwa, now focus on flour, semolina and gram flour