वय 75 वर्ष, शुगर, डायलिसिस असतानाही ते ठरले कोरोना योद्धा 

प्रमोद बोडके 
Wednesday, 6 May 2020

कोरोनामुळे मृत पावल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. या सर्वांना अपवाद ठरणारी घटना आज सोलापुरात घडली आहे. सोलापुरातील 75 वर्षीय व्यक्तीने शुगर, डायलिसिस असे आजार असताना देखील कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 

सोलापूर : अमेरिका असो की पाकिस्तान. भारत असो की स्पेन आणि इटली. संपूर्ण विश्‍वच आज कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. प्रत्येकाच्या मनात कोरोनाची धास्ती असताना आज सोलापुरात चमत्कार घडला. 75 वर्ष वय असलेल्या आणि शुगर, डायलिसिस यासारखे आजार असलेल्या एका व्यक्तीने कोरोनावर मात केली. कोरोना पॉझिटिव्ह येऊन ते निगेटिव्ह झाले आणि सोलापूर जिल्ह्यातील पहिले कोरोना योद्धे ठरले. आज त्यांच्यावर (शुगर आणि डायलिसिस) सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा - प्राथमिकचे शिक्षणाधिकारी काय म्हणाले वाचा 

नामांकित हॉस्पिटलमधून लागण 
सध्या सोलापुरात चर्चेत असलेल्या आणि सोलापुरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 75 वर्षे व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. वेळीच ही बाब लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. 75 वर्षीय व्यक्तीने दुर्दम्य इच्छाशक्ती दाखविली. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील डॉक्‍टरांनी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठाची जोड दिली. 

हेही वाचा - दोघेही प्रशासनात अधिकारी; विवाह मात्र शेतात झाडाखाली

सोलापुरात घडली अपवाद ठरणारी घटना 
सर्वांचे फलित म्हणजे आज सोलापूर जिल्ह्यातील 75 वर्षीय व्यक्ती, ज्याला शुगर व डायलिसिस असे आजार आहेत हा व्यक्ती कोरोना मुक्त झाला आहे. संपूर्ण देशभरात व महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींना शुगर, रक्तदाब, डायलिसिस, हृदय विकाराचा झटका यासारखे आजार असल्याचे समोर आले आहे. तसेच ज्या व्यक्ती 50 वर्षांच्या पुढील आहेत, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशा व्यक्तींना कोरोनाची बाधा लवकर होत असून अशा व्यक्ती कोरोनामुळे मृत पावल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. या सर्वांना अपवाद ठरणारी घटना आज सोलापुरात घडली आहे. सोलापुरातील 75 वर्षीय व्यक्तीने शुगर, डायलिसिस असे आजार असताना देखील कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 

महाराष्ट्रातील बहुधा पहिलीच घटना 
सोलापुरातील 75 वर्षे व्यक्ती नामांकित रुग्णालयात उपचार घेत होती. त्यांना शुगर, डायलिसिस असे आजार होते. या व्यक्तीने कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. या वयातील व्यक्तीने शुगर, डायलिसिस असतानादेखील कोरोनावर केलेली मात ही महाराष्ट्रातील बहुधा पहिलीच घटना असावी. 
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At age 75, Sugar, on dialysis, became a Corona Warrior