ती मदत बांधकाम कामगारापर्यंत पोचलीच नाही

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 23 मे 2020

या वर्षी कोरोनाचे संकट आल्याने लॉकडाउन पुकारण्यात आले. या कालावधीत बांधकाम कामगारांना त्यांचे काम बंद करण्याची वेळ आली. बांधकाम कामगार रोजच्या मजुरीवर अवलंबून असतात. सध्या बांधकाम बंद असल्याने शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले गेले. प्रयत्नातून कामगारांच्या उदरनिर्वाहसाठी आर्थिक मदतीचा निर्णय झाला. 

सोलापूरः कोरोना संकटात बांधकाम कामगारांची मजुरी बुडाल्याने शासनाने त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, प्रत्यक्षात एक महिन्याचा कालावधी उलटूनही त्यांना एक रुपयाची मदत मिळाली नाही. त्यामुळे कामगार मदतीच्या रकमेसाठी कामगार कार्यालयात हेलपाटे घालत आहेत. 

हेही वाचाः आईबाबासाठी अन लेकराबाळांसाठी उदबत्ती तर विकलीच पाहिजे 

या वर्षी कोरोनाचे संकट आल्याने लॉकडाउन पुकारण्यात आले. या कालावधीत बांधकाम कामगारांना त्यांचे काम बंद करण्याची वेळ आली. बांधकाम कामगार रोजच्या मजुरीवर अवलंबून असतात. सध्या बांधकाम बंद असल्याने शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले गेले. प्रयत्नातून कामगारांच्या उदरनिर्वाहसाठी आर्थिक मदतीचा निर्णय झाला. 

हेही वाचाः अक्कलकोटमधील मृत व्यापाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह 

राज्य शासनाच्या कामगार विभागाने या बाबत एप्रिल महिन्यात आदेश काढले. त्यानुसार महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना ही मदत पोचवण्याचे ठरवले. कामगारांची रोजंदारी बुडाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट आले आहे. त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्याचे आदेशात नमूद केले आहे. 18 एप्रिलला हे आदेश निघाले. ही मदतीची रक्कम कामगाराच्या खात्यात अद्याप जमा झालीच नाही. 
आदेशाची माहिती मिळाल्याने बांधकाम कामगारांनी त्यासाठी कामगार कार्यालयात चौकशी केली. कोरोनामुळे कार्यालय देखील बंद असते. आदेश प्राप्त झाल्यानंतर काही दिवसात या कामगारांना मदतीची रक्कम मिळणे गरजेचे होते. लॉकडाउनची मुदत तीन वेळा वाढली तरी प्रत्यक्षात मदतीची रक्कम अद्याप कामगारांना मिळाली नाही. सध्या कोणतेच काम नसल्याने या कामगारांकडे घरखर्च चालवण्याची अडचण झाली आहे.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: That aid never reached the construction workers