31 मार्चपर्यंत सर्व पंप बंद ठेवण्याचे आदेश

तात्या लांडगे
बुधवार, 25 मार्च 2020

यांना आदेश लागू नाहीत 

 • अन्नधान्य, भाजीपाला, फळे, मांस, किराणा, दूध, पाणी, गॅस वाहतूक करणारी वाहने 
 • औषधे, रुग्णसेवा करणारी वाहने, आरोग्य, किड नियंत्रण, वस्तू व कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांची वाहने 
 • वैद्यकीय सेवा पुरविणारे खासगी, शासकीय डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची वाहने 
 • सर्व शासकीय वाहने, वेद्यकीय उपचारासाठी सहाय करणारी वाहने 
 • कायदेशीर कर्तव्य बाजावणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाहने 

सोलापूर : कोरोना या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शहर- जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. मात्र, सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत पेट्रोल- डिझेल भरण्यासाठी पंपांवर वाहनांची मोठी गर्दी होऊ लागल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 31 मार्चपर्यंत सर्व पंप बंद ठेवण्याचे आदेश काढले. त्यामध्ये अत्यावश्‍यक सेवा बजावणारी वाहने, शासकीय वाहने व कायदेशीर कर्तव्यावरील व्यक्‍तींच्या वाहनांसाठी सवलत देण्यात आली आहे. 

हेही नक्‍की वाचा : आश्‍चर्यकारक ! 48 तासांत पोलिसांत दाखल नाही एकही गुन्हा 

पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती एकत्रित फिरु नयेत या हेतूने जिल्हाभर संचारबंदी लागू केली आहे. तरीही पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी पंपांवर दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठी गर्दी होऊ लागली होती. कोरोनाच्या संसर्गाची भिती असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेत बुधवारी (ता. 25) रात्री 12 ते 31 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत सर्व पेट्रोल व डिझेल पंप बंद ठेवण्याचे आदेश दिले. तर कोरोनाच्या भितीने खासगी रुग्णालये बंद ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला. 

हेही नक्‍की वाचा : धक्‍कादायक ! कोरोनाची भिती तरीही लाचेचे 63 गुन्हे 

यांना आदेश लागू नाहीत 

 • अन्नधान्य, भाजीपाला, फळे, मांस, किराणा, दूध, पाणी, गॅस वाहतूक करणारी वाहने 
 • औषधे, रुग्णसेवा करणारी वाहने, आरोग्य, किड नियंत्रण, वस्तू व कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांची वाहने 
 • वैद्यकीय सेवा पुरविणारे खासगी, शासकीय डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची वाहने 
 • सर्व शासकीय वाहने, वेद्यकीय उपचारासाठी सहाय करणारी वाहने 
 • कायदेशीर कर्तव्य बाजावणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाहने 

हेही नक्‍की वाचा : मोठा निर्णय ! जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमध्ये आता विलगीकरण कक्ष 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती... 

 • होम कोरोन्टाईलमधील 215 पैकी 78 व्यक्‍ती गेल्या घरी 
 • केगाव येथील आयसोलेशन वॉर्डमधील 53 पैकी 27 जण घरी परतले 
 • सध्या निगराणीखाली असलेल्या 25 पैकी 22 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असून तिघांचे रिपोर्ट गुरुवारी येणार 
 • आंतरराज्य सीमेवर एक हजार 165 वाहनांमधील चार हजार 111 जणांची केली तपासणी 
 • आंतरजिल्हा सीमेवर दोन हजार 990 वाहनांमधील सहा हजार 997 जणांची कोरोना तपासणी केली 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All Petrol disel pumps closed till March 31