
केत्तुर(सोलापूर): गेल्या पंधरा दिवसांपासून वरचेवर पडत असलेल्या पावसाने जिह्यातील बहुतांश पडीक माळरानाने आता आत्ता हिरवी चादर पसरली आहे.परिणामी कमी अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस झाल्याने माळरानावर असलेली विवध रान फुले फुलली असल्याने माळरानावर वेगळाच बहर आल्याचं चित्र दिसत आहे. रंगीबेरंगी फुललेली ही फुले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
रस्त्याच्या कडेचा मोकळ्या जागा, माळरानावर असलेल्या वगळी, नाले, पडीक शेते, शेताचे बांध इत्यादी ठिकाणी मुबलक प्रमाणात विविधरंगी रानफुले फुलली आहेत. असंख्य वर्षायू वनस्पतीं रुजण्यासाठी ही झाडे बहरतात. फुलोऱ्यात आलेल्या रानफुलांचा मध मिळवण्यासाठी मधमाशा फुलांवर दिसून येतात. असंख्य किडे, फुलपाखरे, मुंग्या यांचाही अधिवास या ठिकाणी दिसून येतो. दवबिंदूची दुलई पांघरलेली हिरव्या कुरणावर शिंपल्यासारखी दिसणारी ही रंगीबेरंगी रानफुले लक्ष वेधून घेत आहेत.
रानफुलांच्या आढळणाऱ्या वनस्पती
केनपट, दुरंगी बाभळी,टणटणी,घाणेरी,ईचका,तरवड ,सापकांदा ,गुलाबी उन्हाळी,पांढर फळी,सराता,पुनर्नवा,कुर्डु,धोतरा ,माकड शिंगी,पाथरी ,भुई रिंगणी,गोधडी,काळमाशी रानभेडी,काचली,बरबडा,कललावी,छोटाकळपा,कोरांती,इत्यादी प्रकारच्या रानफुलांच्या वनस्पती आढळतात". -
- अरविंद कुंभार,वनस्पती अभ्यासक, अकलुज.
रानफुलाचे संवर्धन होणे गरजेचे
या वर्षी विविधरंगी रानफुले दिसत असली तरी दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून हे सगळंच वरचेवर कमी होताना दिसतंय. माळावरच्या मातीची धूप आणि वीटभट्टीसाठी लागणारी माती काढल्यामुळे माळावरच्या मातीचा वरचा थरच गायब होतोय. त्याबरोबरच त्यात सुप्तावस्थेत असलेल्या बिया ही नष्ट होऊन जाताहेत. या रानफुलाच्या झाडांचे जतन व संवर्धन झाले पाहिजे.
-कल्याणराव साळुंखे, पर्यावरणप्रेमी, कुभेज (ता.करमाळा)
संपादनः प्रकाश सनपूरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.