हिरज परिसरात हिवाळी पाहुणा धुतर ससाण्याचे आगमन 

प्रकाश सनपूरकर
Saturday, 17 October 2020

त्यांनी पक्ष्याचे फोटो निसर्ग अभ्यासक रत्नाकर हिरेमठ यांना पाठवून त्या पक्ष्याची ओळख करून घेतली. त्या पक्ष्याचे फोटो पाहून रत्नाकर याने हा अतिशय दुर्मिळ आणि कमी प्रमाणात दिसणारा धुतर ससाणा आहे असे सांगितले. तसेच आतापर्यंत सोलापूर मध्ये या पक्ष्याचे फोटोग्राफी रेकॉर्ड कुणाकडे नव्हते. या पक्ष्याला इंग्रजीमध्ये युरॅसियन हॉबी असे नाव आहे. धुतर ससाणा हा एक शिकारी पक्षी आहे. त्याला मराठीमध्ये धूती शिक्रा, अंधारी बाज, धूती शिखरा असेही म्हणतात.

सोलापूरः शहरालगत असलेल्या हिरज परिसरात हिवाळ्यात स्थलांतरित होऊन आलेला धुतर ससाणा हा पक्ष्याचे वास्तव्य आढळले आहे. 

हेही वाचाः महापुरात वाहू लागला माणुसकीचा झरा ! देगाव येथील आपतग्रस्तांना केली युवकासह विविध संस्थांनी मदत 

निसर्ग अभ्यासक संतोष धाकपाडे हे हिरज परिसरात फेरफटका मारायला गेले असता त्यांना एक शिकारी पक्षी दिसून आला. सुरवातीला तो बहिरी ससाणा असल्याचे भासले. मात्र त्यानंतर त्यांनी त्या पक्ष्याचे फोटो काढले. 

हेही वाचाः वाटचाल कोरोनामुक्तीकडे ! शहर व तालुक्‍यात एकही अहवाल आला नाही पॉझिटिव्ह 

त्यांनी पक्ष्याचे फोटो निसर्ग अभ्यासक रत्नाकर हिरेमठ यांना पाठवून त्या पक्ष्याची ओळख करून घेतली. त्या पक्ष्याचे फोटो पाहून रत्नाकर याने हा अतिशय दुर्मिळ आणि कमी प्रमाणात दिसणारा धुतर ससाणा आहे असे सांगितले. तसेच आतापर्यंत सोलापूर मध्ये या पक्ष्याचे फोटोग्राफी रेकॉर्ड कुणाकडे नव्हते. या पक्ष्याला इंग्रजीमध्ये युरॅसियन हॉबी असे नाव आहे. धुतर ससाणा हा एक शिकारी पक्षी आहे. त्याला मराठीमध्ये धूती शिक्रा, अंधारी बाज, धूती शिखरा असेही म्हणतात. हा पक्षी आकाराने कबुतरा एवढा असतो. तो बहिरी ससाण्यासारखा दिसतो. बहिरी ससाणाच्या तुलनेत लहान असतो. त्याच्या अंगावर पट्टे नसतात. अरुंद मिशा व मानेवरच्या बाजूला पांढरा चट्टा असतो. पोटाखालचा भाग काळसर लाल असतो. हा पक्षी उडताना लांब आणि रुंद पंखांचा व लहान शेपटीचा वाटतो, धुतर ससाणा हा हिवाळी पाहुणा आहे. पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश आणि भारतात दक्षिणेकडे बेळगावपर्यंत त्याचे अस्तित्व पाहण्यास मिळते. हा पक्षी सर्वसाधारणपणे माळराने आणि विरळ झाडे असलेला प्रदेशात पाहण्यास मिळतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrival of winter guest dhutar rabbits in Hiraj area