यंदा 19 वर्षांनी आला आश्विन अधिक मासाचा योग; शुक्रवारपासून प्रारंभ : पंचांगकर्ते मोहन दाते 

श्‍याम जोशी 
Tuesday, 15 September 2020

दर तीन वर्षांनी एकदा कोणता तरी महिना अधिक मास येतो. त्यामध्येसुद्धा सामान्यतः 27 ते 35 महिन्यांत अधिक मास येतो आणि दर 19 वर्षांनी पुन्हा तोच महिना अधिक मास येतो. यापूर्वी 2001 मध्ये आश्विन महिनाच अधिक मास होता. यंदा पुन्हा 19 वर्षांनंतर तो योग आला आहे. पुढे 2039 साली म्हणजे शके 1961 मध्ये 19 सप्टेंबर ते 17 ऑक्‍टोबर 2039 या कालावधीत अधिक आश्विन मास आहे. 

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : दर तीन वर्षांनंतर येणाऱ्या अधिक मासाची सुरवात शुक्रवार (ता. 18) पासून होत आहे. यंदाचा अधिक मास आश्विन महिना आहे. हा महिना अधिक मास असण्याचा योग 19 वर्षांनंतर आल्याची माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

हेही वाचा : "धडधड' अजून मंदच ! साडेचार कोटींची उलाढाल आली अडीच कोटींवर; अनेक "टेक्‍स्टाईल' बंदच 

दर तीन वर्षांनी एकदा कोणता तरी महिना अधिक मास येतो. त्यामध्येसुद्धा सामान्यतः 27 ते 35 महिन्यांत अधिक मास येतो आणि दर 19 वर्षांनी पुन्हा तोच महिना अधिक मास येतो. यापूर्वी 2001 मध्ये आश्विन महिनाच अधिक मास होता. यंदा पुन्हा 19 वर्षांनंतर तो योग आला आहे. पुढे 2039 साली म्हणजे शके 1961 मध्ये 19 सप्टेंबर ते 17 ऑक्‍टोबर 2039 या कालावधीत अधिक आश्विन मास आहे. मात्र यावर्षी पासून तीन वर्षांनी येणारा अधिक महिना हा श्रावण असणार आहे. त्याचा कालावधी शके 1945 मध्ये 18 जुलै ते 16 ऑगस्ट 2023 दरम्यान असल्याचे श्री. दाते यांनी सांगितले. 

हेही वाचा : लॉकडाउन पथ्यावर ! लाईट फिटिंगची कामे करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराने बनवली इलेक्‍ट्रिक मोटारसायकल 

अधिक मास म्हणजे काय? 
अधिक मास म्हणजे नेमके काय, याबाबत श्री. दाते म्हणाले, "चैत्र, वैशाख, ज्येष्ठ याप्रमाणे 12 महिने आहेत. एका आमावास्येपासून दुसऱ्या आमावास्येपर्यंत एक चांद्रमहिना असतो. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्रमासाचा आरंभ होतो त्यास चैत्रमास म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्रमासाचा आरंभ होतो त्यास वैशाख मास म्हणतात. याप्रमाणे अनुक्रमाने पुढील चांद्रमास होत जातात. प्रत्येक चांद्र महिन्यात सूर्याचे राशी संक्रमण झाले तर तो नेहमीचा चांद्रमास असतो. परंतु ज्या चांद्रमासात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही त्या महिन्यास अधिक मास म्हणतात. यामध्येसुद्धा चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन व फाल्गुन हे अधिक मास होऊ शकतात. 

अधिक मास कसा तयार होतो? 
पंचांगीय गाणितानुसार अधिक मास निर्मितीबाबत श्री. दाते म्हणाले, "सौर वर्ष 365 दिवसांचे असते, तर चांद्रवर्ष हे 354 दिवासांचे असते. म्हणजे चांद्रवर्ष हे 11 दिवसांनी कमी असते. सुमारे तीन वर्षांतून एकदा अधिक मास आला की सौरवर्ष व चांद्रवर्ष यांची सांगड घातली जाते आणि ऋतुचक्राशी सुद्धा जमवून घेतले जाते. सूर्य व चंद्र यावरच मुख्यत: सृष्टीची स्थिती अवलंबून आहे. प्रत्येक चांद्रमासात सूर्याचे राशी संक्रमण झाले तरच त्या महिन्यास शूचित्व प्राप्त होते. म्हणून रवी संक्रमण न झाल्यामुळे होणाऱ्या मासास अधिकमास, मलमास, धोंडामास असेही म्हणतात. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashwin Adhik month is starting from Friday