
(शेटफळ) सोलापूर : 'प्रिसिजन कंपनी' व शेटफळ येथील 'बोलवाडी प्रकल्प' यांच्यावतीने घेतलेल्या ताटवाटी चाचणी उपक्रमातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाड्यामधून शिकत असलेल्या बालकांना बंगळूरु येथील 'गिफ्ट एबल' या संस्थेच्या वतीने तब्बल 30 लाख रुपयांची दर्जेदार श्रवणयंत्रे देणार असल्याची घोषणा 'गिफ्ट एबल' चे समन्वयक देवदास निराकार यांनी केली.
शेटफळ तालुका मोहोळ येथील 'व्हाईस ऑफ व्हाईसलेस' च्या पालक मेळाव्यावेळी श्री. निराकार बोलत होते. यावेळी सुभाष वेदपाठक, पत्रकार विरण कुलकर्णी, व्हाईसलेसच्या अध्यक्ष जयप्रदा भांगे, सदस्य विश्वनाथ नकाते, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती पवार आदी उपस्थित होते.
प्रिसिजन आणि बोलवाडी प्रकल्प यांच्यावतीने जिल्हाभर घेतलेल्या ताटवाटी चाचणी उपक्रमातून आढळलेल्या काही कर्णबधिर बालकांना श्रवण यंत्रांची गरज होती. बोलवाडी प्रकल्पाच्या वतीने 'गिफ्ट एबल' कडे या श्रवण यंत्रांची मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने श्री. निराकार यांनी प्रत्यक्ष संस्थेच्या बालकांना व त्यांच्या पालकांना भेट दिली. आयुष्यभरासाठी बहिरेपणामुळे मुकेपणा नशिबी आलेल्या बालकांनी श्री. निराकार यांच्याशी बोलून संवाद साधला असता ते प्रभावित झाले. येथे सुरू असलेल्या स्पीच थेरपी उपक्रमाचे व बालकांच्या बोलण्याचे त्यांनी कौतुक केले.
हे ही वाचा : वाळूज ,देगाव परिसरातील ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांची निवड होणार मंगळवारी
'गिफ्ट एबल' देऊ करत असलेली श्रवणयंत्रे नामवंत कंपनीची व 16 चॅनल्सची असणार आहेत. ही श्रवणयंत्रे बालकांना देताना संपूर्ण प्रोग्रामिंग करून मिळणार आहेत. सोबत त्यासाठी लागणारे 'मोल्ड' देखील देण्यात येतील. या श्रवणयंत्रांत बिघाड झाला तर सलग वर्षभर त्याची मोफत दुरुस्ती सेवा पुरवण्यात येणार आहे. एका बालकास 50 हजार रुपयांची याप्रमाणे 30 लाख रुपये किंमतीची ही यंत्रे असतील. ही यंत्रे बसवल्यावर 'आईच शिकवेल आईला' या उद्देशानुसार 'बोलवाडी' परिवारातील यशस्वी माताच पुढील बालकांना शिकवणार आहेत. यावेळी योगेशकुमार भांगे यांनी सूत्रसंचालन केले तर केतकी पाटील हिने आभार व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.