नियमीत कर्जफेड करणाऱ्या बचतगटांमागे कर्जवसुलीचा बॅंकांनी लावलाय तगादा 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 25 जून 2020

यावर्षी मार्च अखेर संपणारे आर्थिकवर्ष यावर्षी कोविड 19 च्या प्रभावामूळे जून अखेरपर्यंत पुढे ढकलले होते. वाळूज परिसरासह मोहोळ तालुक्‍यातील विविध गावांमधील महिला बचत गटांकडील कर्जाच्या वसूलीसाठी खासगी बॅंकासह सरकारी बॅंकांनी तगादा लावला आहे. या गटांनी दुग्ध व्यवसाय, कुटीरोद्योग, दुकाने, शिलाई मशीन, घरगुती व्यवसाय, खाद्यपदार्थ निर्मिती आदी अनेक प्रकारच्या व्यवसायासाठी भांडवलापोटी कर्ज घेतले होते. मात्र लॉकाडाउनच्या कालावधीत या व्यवसायातून कोणतेही उत्पन्न बचत गटांना मिळाले नाही.

वाळूज़(सोलापूर)ः बचतगटांच्या कर्ज वसुलीसाठी खासगी वित्त संस्था व बॅंका तगादा लावत आहेत. लॉकडाउनमुळे कोणताही व्यवसाय करता न आल्याने या गटांना कर्ज फेड करता येत नाही. नियमीत कर्जफेड हे बचत गटांच्या पारदर्शक कारभाराचे वैशिष्टय आहे. तरीसुद्धा व्यवसायातून होणारे सर्व व्यवहार थांबल्याने त्यांच्या कर्जाच्या परतफेडीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

हेही वाचाः सोलापूर शहरात देशी दारू विक्रीला परवानगी द्या 

यावर्षी मार्च अखेर संपणारे आर्थिकवर्ष यावर्षी कोविड 19 च्या प्रभावामूळे जून अखेरपर्यंत पुढे ढकलले होते. वाळूज परिसरासह मोहोळ तालुक्‍यातील विविध गावांमधील महिला बचत गटांकडील कर्जाच्या वसूलीसाठी खासगी बॅंकासह सरकारी बॅंकांनी तगादा लावला आहे. या गटांनी दुग्ध व्यवसाय, कुटीरोद्योग, दुकाने, शिलाई मशीन, घरगुती व्यवसाय, खाद्यपदार्थ निर्मिती आदी अनेक प्रकारच्या व्यवसायासाठी भांडवलापोटी कर्ज घेतले होते. मात्र लॉकाडाउनच्या कालावधीत या व्यवसायातून कोणतेही उत्पन्न बचत गटांना मिळाले नाही. बाहेर गावी माल पाठवता न येणे, मालाची विक्री न होणे आदी अनेक अडचणी त्यांच्या समोर होत्या. तसेच कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी कोणतीच उत्पादन व विक्रीची कामे झालेली नाहीत. 

हेही वाचाः हे पाच जिल्हे कोरोना रूग्ण बरे होण्याच्या दरात पिछाडीवर 

वाळूज व परिसरातील देगाव, भैरववाडी, मनगोळी या गावांसह तालुक्‍यातील विविध गावांतील महिला बचत गटांना परराज्यातील वाया फायनान्स, भारत 
फायनान्स, मधुरा फायनान्स, सखीकोष मंच आणि सरकारी बॅंकांनी महिला बचत गटांना एक वर्षापूर्वी कर्जवाटप केले आहे. 
कर्जाच्या हप्त्यासाठी मायक्रो फायनान्सचे कर्मचारी पैसे भरण्यासाठी सभासदांना तगादा लावत आहेत. कोरोनामुळे अनेक बचतगटांचे काम थांबले आहे. त्यामूळे ते आर्थिक संकटात सापडले आहेत. आर्थिक वर्ष जूनअखेर संपत असल्याने पतपुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी वसूलीसाठी तगादा सुरु केला आहे. आता कर्जाचे हप्ते भरायचे कसे हा प्रश्न महिलांबचत गटांसमोर उभा आहे. 

बॅंकांनी तगादा थांबवला पाहिजे 
शासनाने कर्ज वसूलीसाठी तगादा लावू नये असे आदेश असतानाही सरकारी बॅंकासह खासगी बॅंका वसूलीसाठी तगादा लावत आहेत.ही वसूली त्वरीत थांबवावी. 
- रामचंद्र बुद्रूक, तालुका संघटक मनसे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banks have been demanding recovery of loans from self-help groups that repay their loans regularly