लॉकडाउनमध्ये चमकला सोलापूरचा हा "ज्युनिअर उस्ताद' 

Aryan Shinde
Aryan Shinde

सोलापूर : म्हणतात ना, छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. असाच छंद येथील पीएसईएम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या बारावर्षीय आर्यन शिंदे याने जोपासला. त्याने लॉकडाउनच्या काळात तबलावादनात नवनवीन प्रयोग सादर करून त्याचे व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड केले. त्याला एका तासात तीनशेहून अधिक लाईक मिळाल्या व आज त्याचे चॅनेल "फन बिट्‌स'चे शंभरपेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले. 

लॉकडाउनच्या काळामध्ये मुले घरीच असल्याने मुलांच्या बाबतीत मोबाईलचा वाढता वापर लक्षात घेता, इतर छंद जोपासण्याच्या दृष्टीने पालकांनी सजग असायला हवे. त्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर ग्रामसेवक संघटनेचे राज्य समन्वयक तथा सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांनी पालक म्हणून एक स्तुत्य उपक्रम राबविला. त्यांनी त्यांचा मुलगा आर्यनमध्ये असलेली तबलावादनाची कला हेरली व त्याला तबलावादनात नवनवीन प्रयोग करण्यास सांगितले. आर्यनने तसे केलेही. मग श्री. शिंदे यांनी अजून एक शक्कल लढवली. तबला वादनमधील नवीन प्रयोग यू-ट्यूबवर अपलोड करायला सांगितले. तर आर्यनने तसे करून व्हिडीओ काढले व यू-ट्यूबवर स्वत: अपलोड केले. 

शिंदे कुटुंबीयांत कुठलीही संगीत-वाद्याची पार्श्‍वभूमी नाही. पण यू-ट्यूबवर तबलावादन ऐकून आर्यनची बोटे वळवळायची. त्याची तबला शिकण्याची आवड हेरून श्री. शिंदे यांनी त्याला तबला आणून दिला. दोन वर्षांपासून तबलावादक श्री. लिमकर यांच्याकडे तो तबलावादनाचे धडे घेत आहे. आतापर्यंत दोन परीक्षा दिल्या व दोन्ही परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला. लॉकडाउनमध्ये इतर मुले टीव्ही पाहात व मोबाईलवर गेम खेळत होती; परंतु आर्यन तबल्याच्या नवनव्या चाली यू-ट्यूबवर पाहून शिकत होता. 

मुलांच्या कलेला वाव देणे महत्त्वाचे 
मुलांना रागावून, मारून किंवा इतर शिक्षा करून मोबाईलपासून दूर करण्यापेक्षा त्यांच्या आतील कलेला वाव देणे महत्त्वाचे आहे. आर्यनने लॉकडाउनमध्ये तबल्यावर नवनवीन चाली रचल्या. त्याचे चॅनेल "फन बिट्‌स' पाहण्याकरिता सोबतच्या https://youtu.be/-1RmFBFBw-4 लिंकवर जावे. आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एक शाबासकीची थाप लहान मुलांमध्ये आमूलाग्र बदल घडवू शकते. 
- सचिन शिंदे, 
आर्यनचे वडील 

महाराष्ट्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com