
सोलापूर : दमाणीनगर येथील राखी नंदिनी आपर्टमेंट येथे मित्र-मैत्रिणींनी व्हिडिओ कॉलिंगद्वारे एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. देशविदेशात वेगवेगळ्या भागात वास्तव्यास असलेल्या या सर्वांनी कोरोनाविरुद्ध लढण्याचा संदेश दिला आहे. ते आता नोकरी, व्यवसायानिमित्त विखुरले आहेत.
हेही वाचा : पंतप्रधान साहयत निधीस योगदान देत शुभविवाह
काहीजणी लग्न होऊन सासरी गेल्या आहेत. या सोसायटीत 48 सदनिका आहेत. 15 वर्षांपूर्वी येथे 100 च्यावर मुलेमुली होत्या. या सोसायटीत सर्व उत्सव उत्साहात साजरे होत. या लॉकडाउनने तब्बल 15 वर्षांनंतर मित्र- मैत्रिणी एकत्र आले. त्यातील काहीजण आज मराठी चित्रपटात, आयटी क्षेत्रात, डॉक्टर, सीए, बॅंकेत मोठ्या पदावर काम करत आहेत. शिक्षिका, उद्योजक अशा अनेक क्षेत्रांत हे सर्वजण काम करत आहेत. काहीजण भारताबाहेर आहेत.
लॉकडाउन काळात घरी बसून काय करायचे म्हणून जयतीर्थ पडगानूर सर्व मित्रांबरोबर फोनद्वारे विचारपूस करू लागले. लहानपणीच्या अनेक जुन्या आठवणीत सांगत होते. नंतर सर्वांचा व्हाट्सऍप ग्रूप करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी मिळून ठरवलं आणि एक संदेश तयार केला. हा संदेश देण्याचे कारण म्हणजे, संपूर्ण देश आज संकटात आहे. आपल्याला यातून लवकर मुक्त व्हायचे आहे. आपण सुरक्षित राहा, देश सुरक्षित होईल, असा संदेश सर्वांनी तयार केला आहे. यात जयतीर्थ पडगानूर, आश्लेषा पिंपळेकर, मेघना वजीरकर, स्वाती खटावकर, पंढरपूरच्या मनीषा पाटील, डॉ. जयश्री शिनगारे, पुण्याचे धीरज बिडवे, विदुला कुलकर्णी, केदार शेटे, ज्योती कुलकर्णी, योगेश फडके, भुवनेश्वर येथील राणी दोशी आणि अमेरिकेतील अनिकेत बामणे सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.