chin dahan.jpg
chin dahan.jpg

नातेपुतेमध्ये गलवान हल्ल्याचा निषेध करत चीनमधील उत्पादित वस्तूंचे केले दहन 

नातेपुते(सोलापूर)ः चीनने गलवानमध्ये केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चीनच्या उत्पादित वस्तूंचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. 

यावेळी आमदार राम सातपुते म्हणाले की, देशाच्या गौरवशाली इतिहासात गलवानचा भ्याड हल्ला देश कधीही विसरणार नाही. राष्ट्रप्रेमी नागरिकांनी चिनी वस्तू कधीही वापरू नयेत. प्रत्येक भारतीयाने स्वदेशी वस्तू वापरण्याचा निश्‍चय केला पाहिजे. हुतात्मा जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून राष्ट्रप्रेमी तरुण तयार होतील. जेव्हा जेव्हा देशावर संकट येते, तेव्हा देशातील तरुणाई आपसांतील मतभेद विसरून एक होते. हा 1962 चा भारत नसून 2020 चा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारत आहे. आपली प्रगती शेजारी राष्ट्रांना पाहावत नाही. प्रत्येक नागरिकाने देशाभिमानी राहून स्वदेशी वस्तू यापुढे वापरणे गरजेचे आहे. 

यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, सरपंच ऍड. भानुदास राऊत, माजी सरपंच अमरशील देशमुख, भाजपचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण काळे, गणेश पागे, रिपब्लिकन पक्षाचे युवराज वाघमारे, बादल सोरटे, नवाज सोरटे, रासपचे बशीर काझी, बजरंग दलाचे धनंजय पवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राहुल पद्मान, मंगेश दीक्षित, जगदीश देशपांडे, गिरीश पैठणकर, हनुमान मंडळाचे अमर भिसे, राजीव बडवे, विश्‍व हिंदू परिषदेचे एकनाथ ननवरे, शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष किशोर पलंगे, सागर इंगोले, सतीश जमदाडे, भाजपचे शहराध्यक्ष देविदास चांगण, संजय उराडे, विनायक उराडे, पैलवान उमेश सूळ, राजेंद्र अलेकरी, रवी भंडारे, संतोष महामुनी, प्रा. हनुमंत दुधाळ, प्रमोद चिकणे, विवेक लोणारी, अक्षय बावकर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
प्रवीण काळे यांनी प्रास्ताविक केले. ऍड. भानुदास राऊत व बाबाराजे देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com