सोलापूरात उद्योगवाढीसाठी सकारात्मता गरजेची ; कोणी मांडली भूमिका ? वाचा सविस्तर 

शाम जोशी
Saturday, 29 August 2020

उद्योग बॅंक सेवक संस्कृतीक मंडळ तसेच रोटरी क्‍लब ऑफ सोलापूर एमआयडीसी तर्फे आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेत जी. बी. मोदी यांनी उद्योजकांना मार्गदर्शन करत केंद्र व राज्य सरकारच्या विविध उद्योजकाभिमुख योजनांची माहिती दिली. 'आत्मनिर्भर युवा एवम्‌ महिला कैसे बने' या विषयावर त्यांनी 55 व्या बौद्धिक व्याख्यानमालेचे सातवे पुष्प गुंफले. 

 

द.सोलापूर (सोलापूर): पंढरपूर, अक्कलकोट यासारखे मोठे तीर्थक्षेत्र, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, विडी-यंत्रमाग कारखाने, चादर व टेरी टॉवेलचे उत्पादन, हातमाग उत्पादनाची मोठी क्षमता, डाळिंब व कृषी पूरक वातावरण तसेच स्वतंत्र विद्यापीठ यासारखे अनेक पॉझिटिव्ह पोटेन्शिअल सोलापूर जिल्ह्यात आहेत.तसेच सोलापूर जिल्हा औद्योगिकदृष्ट्या 'डी' झोन मध्ये येतो. या झोन अंतर्गत शासकीय योजना मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. येथे उद्योगाला खूप पोषक वातावरण आहे. आवश्‍यकता आहे ती पॉझिटिव्ह विचार करण्याची. आत्मनिर्भर होण्याकरिता सोलापूरकरांना इतरांची आवश्‍यकता नसल्याचे प्रतिपादन सीए जी. बी. मोदी यांनी येथे केले. 

हेही वाचा : मंगळवेढा तालुक्‍यात 15 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश 

उद्योग बॅंक सेवक संस्कृतीक मंडळ तसेच रोटरी क्‍लब ऑफ सोलापूर एमआयडीसी तर्फे आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेत जी. बी. मोदी यांनी उद्योजकांना मार्गदर्शन करत केंद्र व राज्य सरकारच्या विविध उद्योजकाभिमुख योजनांची माहिती दिली. 'आत्मनिर्भर युवा एवम्‌ महिला कैसे बने' या विषयावर त्यांनी 55 व्या बौद्धिक व्याख्यानमालेचे सातवे पुष्प गुंफले. 

हेही वाचाः सोलापूर ग्रामीणमध्ये 214 कोरोनाबाधित 

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान किसान संपदा योजनेअंतर्गत अन्नप्रक्रिया प्रकल्पाकरिता कमीत कमी पाच कोटीचे अनुदान मिळू शकते. तर क्‍लस्टर प्रकल्पाकरिता जास्तीत जास्त दहा कोटी मिळू शकते. जिल्हा उद्योग केंद्र मार्फत पुरुष उद्योजकांना जवळपास आठ टक्‍क्‍यांची सबसिडी मिळते. तर महिला उद्योजकांना करिता 80 टक्के सबसिडी मिळते. टेक्‍स्टाईल उद्योजक जर गारमेंट प्रकल्प सुरू करत असतील तर त्यांना 60 टक्‍क्‍यांची सबसिडी मशिनरी खरेदी करता मिळू शकते. यासारख्या अनेक योजना, अनुदान उपक्रम केंद्र व राज्य सरकार कडून सुरू आहेत. उद्योजक आत्मनिर्भर व्हावेत आणि त्यातून रोजगार उपलब्ध होतील, हा त्यामागचा उद्देश आहे. 
सुरूवातीला रोटरी क्‍लब सोलापूर एमायडिसीचे अध्यक्ष प्रा. विठ्ठल वंगा यांनी प्रास्ताविक तर सचिव शंकर गुंडला यांनी आभार मानले. गणेश इराबत्ती यांनी वक्‍त्यांचा परिचय करून दिला. यावेळी समितीचे प्रेसिडेंट यल्लादास लचमापुरे, अध्यक्ष सिद्धेश्वर गड्डम, प्रकाश पुल्ली, सत्यनारायण गुर्रम, गोवर्धन चव्हाण, गणेश इराबत्ती, श्रीनिवास सामलेटी, आनंद जंगम, पुंडलिक पगडीमल, राजू पोतन, कालिदास मानेकरी, अनिल गुजराती, योगीनाथ सपाने आदी उपस्थित होते.  

 
संपादन ः प्रकाश सनपूरकर 

महाराष्ट्र 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CA GB Modi said that positivity is needed for industrial growth in Solapur