शिरनांदगी तलावाच्या कालवा स्वच्छतेने चारशे हेक्‍टर क्षेत्राला मिळणार लाभ 

गुरदेव स्वामी
Sunday, 11 October 2020

मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील शेतकऱ्यांसाठी वरदायीनी ठरलेल्या शिरनांदगी तलावात सोडलेले म्हैसाळ योजनेचे पाणी व पाऊस मुळे यंदा शंभर टक्के भरला. गेल्या दहा वर्षापासून हा तलाव पुर्ण क्षमतेने भरला नव्हता. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला परंतु यंदा कृष्णा नदीच्या पुराने वाया जाणारे पाणी दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय विद्यमान सरकारने घेतल्यामुळे हे पाणी म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून तलावांमध्ये सोडण्यात आले. त्यानंतर या परिसरामध्ये देखील चांगला पाऊस झाल्यामुळे तलाव शंभर टक्के भरला. 

भोसे(सोलापूर)ः शिरनांदगी तलावातील पाणी वाटपाचे नियोजन करण्याच्या सुचना आ.भारत भालके देत जे.सी.बी उपलब्ध करून दिल्यानंतर कालव्यात वाढलेली फिरंगी झाडे व असलेले अडथळे दूर करण्याचे काम यांत्रिकी उप विभागाने सुरू केले. त्यामुळे रब्बीसाठी 400 हेक्‍टर क्षेत्राला पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या. 

हेही वाचाः धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणानेच ः रुपा भवानी मंदिरही राहणार बंदच 

मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील शेतकऱ्यांसाठी वरदायीनी ठरलेल्या शिरनांदगी तलावात सोडलेले म्हैसाळ योजनेचे पाणी व पाऊस मुळे यंदा शंभर टक्के भरला. गेल्या दहा वर्षापासून हा तलाव पुर्ण क्षमतेने भरला नव्हता. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला परंतु यंदा कृष्णा नदीच्या पुराने वाया जाणारे पाणी दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय विद्यमान सरकारने घेतल्यामुळे हे पाणी म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून तलावांमध्ये सोडण्यात आले. त्यानंतर या परिसरामध्ये देखील चांगला पाऊस झाल्यामुळे तलाव शंभर टक्के भरला. 

हेही वाचाः जयहिंद शुगरचे बॉयलर अग्नी प्रदिपन ः अकरा लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट 

तलावाचे पाणी पूजन करण्याच्या निमित्ताने आ. भारत भालके या ठिकाणी आले असता येथील शेतकऱ्यांनी हे पाणी रब्बी पिकाला देण्यासाठी कालव्याची अर्धवट कामे पुर्ण करण्याच्या मागणीनुसार संबंधित खात्याला या तलावातील पाण्याचे वाटप करून कालव्याची कामे व असलेली अस्वच्छता दूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.आ भालकेच्या सुचनेची दखल घेत संबंधित खात्याने जे.सी.बी.च्या साह्याने कालव्यातील झाडे तोडून पाण्याचे वितरण व्यवस्थित करता येईल अशा दृष्टीने काम सुरू केले. सध्या 16 किलोमीटरचा असलेल्या कालव्यातील मधील दहा किलोमीटरची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे रब्बीच्या हंगामात शिरनांदगी,चिक्कलगी,रड्डे निंबोणी परिसरातील पिकांना तलावातील पाणी उपलब्ध होऊन या भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. 

पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्याला मिळणार
तलाव उशाला कोरड घशाला अशी स्थिती गेल्या काही वर्षांत झाली. तलावात ना पाणी ना कालव्याची कामे असे झाले. आता यावर्षी तलावातील पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्याला मिळणार आहे. 
- मायाक्का थोरबोले, सरपंच शिरनांदगी. 

चारशे हेक्‍टरला पाणी उपलब्धता 
तलावातील पाणी वाटपाचे नियोजन सुरू असून जे.सी.बी ने दहा कि.मी चे कालव्यातील स्वच्छतेचे काम होणार आहे. त्यामुळे जवळपास 400 हेक्‍टर क्षेत्रास पाणी मिळणे शक्‍य होणार आहे. 
- आप्पासाहेब मांजरे.अभियंता  
 
संपादनः प्रकाश सनपूरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The canal cleaning of Shirnandagi Lake will benefit an area of ​​400 hectares