esakal | बॅंकेसमोर आंदोलन केल्याप्रकरणी 24 जणांविरोधात गुन्हा दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

logo

कर्ज नाकारत असल्याने केले होते आंदोलन 
मराठा समाजाला शासकीय योजनेतील कर्ज एसबीआयच्यावतीने नाकारले जात असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी एसबीआयच्या बाळीवेस शाखेसमोर आंदोलन करण्यात आले होते. शाखा व्यवस्थापकाच्या अंगावर शाई फेकून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. 

बॅंकेसमोर आंदोलन केल्याप्रकरणी 24 जणांविरोधात गुन्हा दाखल 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : संभाजी ब्रिगेड व इतर मराठा समाजाच्या संघटनांच्यावतीने बुधवारी सकाळी 11 च्या दरम्यान सोलापुरातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या बाळीवेस शाखेसमोर आंदोलन करण्यात आले होते. कोरोना महामारीत आंदोलन बेकायदेशिरपणे आंदोलन केल्याप्रकरणी सहाय्यक फौजदार भगत राणुसिंग शिवसिंगवाले यांनी जोडभावी पेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार 24 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोरोनामुळे उद्भवलेला संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण, होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित म्हणून पारित केलेल्या आदेशाचा भंग करून सुरक्षित अंतर न ठेवता सार्वजनिक आरोग्य धोक्‍यात येईल असे वर्तन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक ऊर्फ विक्रम वासुदेव वाडदेकर, वैभव अरुण बोराडे, प्रसाद मारुती सातपुते, लखन विष्णू थिटे, बबन आण्णा माने, माऊली उर्फ अनंत राजाराम पवार, सिताराम नवनाथ बाबर, स्वप्निल उर्फ शनिमहाराज औदुंबर धुळे, संभाजी दशरथ भोसले, अमरजीत राजाराम पाटील, आनंद ज्ञानेश्वर माने, प्रशांत श्रीमंत नलावडे, महेश हणमंत गुंड, नवनाथ विश्वनाथ कोल्हे, सचिन संपत कोळेकर, उमेश गोपाळ दाढे, लक्ष्मण पांडुरंग चव्हाण, तात्यासाहेब तुळशीराम चौगुले, महेश साहेबराव गुंड, रूपाली अरुण बोराडे, रुक्‍मिणी रामलिंग कुंभार, पार्वती वसंत शिंदे, मनीषा राजू पवार, राधा मारुती घाडगे अशा 24 जणांवर सोलापुरातील जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

go to top