sahakar.jpg
sahakar.jpg

जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांनी कोरोना संकटातही राखली स्वतःची 'पत' 

सोलापूरः जिल्हाभरातील सहकारी पतसंस्थांनी सप्टेंबर मध्ये अर्धवार्षिक कामगीरीमध्ये कोरोना संकटावर जिद्दीने मात करत व्यवसाय तर टिकवल्याचे चित्र आहे. बॅंकांचे ग्राहक मिळवत असताना झटपट कर्ज वाटपातून खाजगी सावकारीला आळा घालण्याची कामगीरी बजावली. कोरोना संकटातही या संस्था भक्कम आर्थिक संतुलन ठेवून थोडाफार नफा देखील कायम ठेवतील असा अंदाज आहे. 

जिल्ह्यात विविध प्रकारच्या सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत. यामध्ये नागरी पतसंस्था, ग्रामीण संस्था, सेवक पगारदार संस्था आदींचा समावेश आहे. सप्टेंबरमध्ये या पतसंस्थाचे अर्धे वित्तीय वर्ष संपले. त्यामुळे कोरोना संकटात या संस्थाची आर्थिक कामगिरी वाईट होईल असा सहकार क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात पतसंस्थांनी या कालावधीत केलेली कामगीरी अधिक चांगली झाल्याचे दिसून आले. 

या पतसंस्थांनी पत नसलंल्यांना ग्राहकांना पत देणे हा उद्देश ठेवून पतपुरवठा केला. तसेच ठेवीदारांच्या कमी रकमेच्या ठेवी स्विकारल्या. अधिक ग्राहकांना छोट्या कर्जाचे वाटप करण्याचे काम केले गेले. लॉकडाउन मध्ये भाजी विक्रेते, दुध विक्रेते, छोटे व्यावसायिक, किराणा दुकानदार, औषधी विक्रेते, रोजच्या कमाईवर अवलंबुन असणारे व्यक्ती यांना सर्वाधिक कर्ज वाटप केले गेले होते. तेव्हा या कर्जदारांपैकी बहुतांश व्यावसायिकांनी जीवनावश्‍यक वस्तु विक्रीच्या परवानगीनुसार व्यवसाय चालवला. तसेच या कर्जदारांची कर्ज न भरण्याची मानसिकता फारशी नसल्याने पतसंस्थांची कर्जवसुली फारशी अडखळली नाही. पिग्मी एजंट किंवा कर्मचाऱ्यांच्या मार्फत या ग्राहकासोबत असलेले रोजचे संबध लक्षात घेऊन वसुलीला प्रतिसाद मिळाला. घरपोच वसुलीची सेवा अनेक पतसंस्थांनी दिली. 
तसेच या ग्राहकांना व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात खेळते भांडवल लागणार म्हणून पन्नास हजार रुपयापर्यंतची कर्जे तातडीने उपलब्ध करून दिली. खासगी सावकारीच्या त्रासातुन ग्राहकांना वाचवत त्यांना हातोहात मिळालेली कर्जाची मदत उपयुक्त ठरली. वसुलीला या मदतीमधून प्रोत्साहन देखील मिळत गेले. बॅंकांचे ठेवीचे कमी व्याजदर व न मिळणाऱ्या सेवाच्या अडचणी लक्षात घेत मोठ्या प्रमाणात बॅंकाचा ग्राहक पतसंस्थांनी वळवून घेतला. तसेच निवृत्तीधारकांच्या बॅंकेत जाण्याच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांचे धनादेश घेऊन त्यांना घरपोच निवृत्ती वेतन पोहोचवले. बॅंकाच्या अडचणीतून या प्रमाणे नविन ग्राहक देखील जोडला गेला. 

पतसंस्थाची स्थिती 
जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था ः 1069 
कर्जवसुलीवर झालेला अल्प परिणाम 
अर्धवार्षिक स्थिती भक्कम 
बॅंकांचा ग्राहक पतसंस्थेकडे वळाला 
छोट्या कर्जाच्या वाटपाने खासगी सावकारीला रोखले 


 
सहकार खात्याकडे मागणी 
या आर्थिक वर्षात शासनाने एनपीएची नोंद कोरोना संकटामुळे न करता पुढील आर्थिक वर्षातील कामगीरीच्या आधारे करावी अशी मागणी सहकार खात्याकडे केली आहे. तरीही अधिकाधिक लाभांश सभासदांना देण्याची भूमिका घेतली गेली आहे. 
- दिलीप पतंगे, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com