प्रेयसीच्या खूनाचा प्रयत्न: पुण्याच्या प्रियकरास दहा वर्षे सक्तमजुरी

प्रेयसीच्या खूनाचा प्रयत्न: पुण्याच्या प्रियकरास दहा वर्षे सक्तमजुरी

सोलापूर : लग्नास मागणी घातल्यानंतर प्रेयसीच्या कुटुंबीयांनी मुलीचे लग्न ठरल्याचे सांगितले. त्यानंतर प्रियकराने प्रेयसीला कटरने मारून खून करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात प्रियकर सुरज रेवणसिध्द म्हमाणे (वय 25 , रा. ताडीवाला रोड, बुध्दविहार, पुणे) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.जी. मोहिते यांनी गुरुवारी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

चॉकलेट देतो मुलीला नेले घरात! अन्‌..

फिर्यादी तुकाराम मल्लाप्पा नवधनगर (वय 58, रा. हैदराबाद) हे 15 ऑक्‍टोबर 2018 रोजी धार्मिक कार्यक्रमासाठी सोलापुरात कुटुंबीयांसमवेत नातेवाईकांकडे आले होते. त्यांची मुलगी अंजू नवधनगर हिचे सोलापुरातील एका मुलाबरोबर लग्न ठरले होते. 19 ऑक्‍टोबर रोजी अंजू आणि कुटुंबातील सदस्य तसेच मित्र मिळून सात रस्ता परिसरातील ओएशिस मॉल, मॅक्‍डोनॉल्ड येथे गेले होते. दुपारी पावणेदोनच्या सुमारास सुरज म्हमाणे हा तिथे आला. त्याने अंजू हिला ओएशिस मॉलच्या डाव्या बाजूकडील पार्किंगमध्ये ओढत नेले. त्या ठिकाणी अंजूच्या गळ्यावर छोट्या कटरने जोराने वार करून तिचा गळा कापला. तसेच सुरज याने स्वत:च्या गळ्यावर देखील वार करून घेतले. जखमी अंजू हिला उपचारासाठी खासगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले होते. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही. कोकरे यांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते. 

विवस्त्र करुन धिंड काढलेल्या महिलेला अखेर न्याय

या खटल्याची न्यायालयामध्ये सुनावणी होवून सरकार पक्षातर्फे 9 साक्षीदार तपासण्यात आले. यातील नेत्र साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, टेक्‍नीशिअन यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. वैद्यकीय पुरावा, तज्ञाचा अहवाल, पंचनामे हे सरकार पक्षाच्या बाजूने असून या पुराव्यामुळे आरोपीने गुन्हा केल्याचे सिध्द होत असल्याचा युक्तीवाद सरकार पक्षाने केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सुरज म्हमाणे याला दहा वर्षे सक्तमजूरी, पाच हजार रूपये दंड तसेच दंड नाही भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, आरोपीतर्फे ऍड. सतीश शेट्टी यांनी काम पाहिले. 

घटनेच्या वीस दिवस आधी फिर्यादी तुकाराम नवधनगर यांच्या पत्नीला आरोपी सुरज म्हमाणे याची मावशी अंबू म्हमाणे हिचा फोन आला होता. मावशीने सुरजसाठी अंजू हिला लग्नाची मागणी घातली. तेव्हा अंजूच्या आईने अंजूचे लग्न ठरल्याचे सांगितले. त्यावेळी मावशीने फोनवरून वाद घातला होता. त्याच कारणावरून सुरजने अंजूच्या खूनाचा प्रयत्न केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com