एकतर्फी प्रेम प्रकरणातून मागितले शरीरसुख

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

सुरज हा पिडीत महिलेच्या घरात घुसला. तिला मारहाण केली. महिलेच्या गळ्यातील गंठण तोडले. मुलीचा टेडीबिअरही फाडला. महिलेच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सोलापूर : एकतर्फी प्रेम प्रकरणातून महिलेचा विनयभंग करणाऱ्या तरुणावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

निवडणूक मुंबईची, सोलापूरला अपेक्षा लक्ष्मीदर्शनाची

सुजित उद्धव सुरवसे (रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ही घटना 9 जानेवारी 2020 पासून आजपर्यंत घडली आहे. सुजित सुरवसे हा तरुण एका महिलेवर एकतर्फी प्रेम करतो. प्रेमप्रकरणातून त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर सुरजने तिच्या घरी आणि कामाची ठिकाणी पाठलाग केला.

शुभांगी बोंडवे यांची तीन दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी 

महिलेला अश्‍लील शिवीगाळ करून धमकी दिली. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता सुरज हा पिडीत महिलेच्या घरात घुसला. तिला मारहाण केली. महिलेच्या गळ्यातील गंठण तोडले. मुलीचा टेडीबिअरही फाडला. महिलेच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime news at solapur