
पांडे (ता.करमाळा जि. सोलापूर) ः पूर्व भागातील शेतकऱ्यांनी कांदा, मका, भईमुग ही पिके केली आहेत. परंतु विहीर, बोअरचे पाणी कमी झाल्याने पाण्याअभावी पिके लागली जळू आहेत. गेल्या वर्षी दहिगावचे पाणी त्यावेळचे आमदार नारायण पाटील यांनी सगळीकडे पोहचविण्यासाठी प्रयत्न केले. यंदा मात्र या योजनेकडे कुणाचे लक्ष आहे की नाही, असा प्रश्न शेतकरी विचारु लागले आहेत.
हेही वाचा ः विठुरायाच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय
पावसाळ्याच्या शेवटी परतीचा पाऊस बऱ्यापैकी झाल्याने रब्बी हंगामात पाणी असूनदेखील हरभरा, ज्वारी पिकावर रोग पडलेला होता. हरभऱ्यावर अळीचा प्रार्दुभाव झाला होता. ज्वारीचे पीक नुसते वाढल्यानंतर त्यामध्ये दाणे भरले नाहीत. उन्हाळी भुईमुगासह हंगामातील पिकासाठी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी येणार होते. विहीर व बोरला पाणी असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी ऊन्हाळी कांदा, भुईमुग, मका आदी पिके केली आहेत. दहीगाव उपसा सिंचन पाणी योजनेचे पाणी वेळेत सोडले नाही.
हेही वाचा ः कोरोना झाल्याची अफवा पसरविणे पडले महागात
उष्णता वाढल्याने तीन ते चार दिवसाला पिकांना पाणी द्यावे लागत आहे. विहीर, बोअरचे पाणी कमी झाल्याने पिकाना पाणी कमी पडू लागले आहे. कांदा, मका, भईमुग ही पिके त्यामुळे वाळू लागली आहेत. दहीगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी येणार या भरवशावर शेतकऱ्यांनी पिके केली, पण अद्याप पाणी आले नाही. विहिर, बोअरचे पाणी कमी झाल्याने पिके जळू लागली आहेत, असे शेतकरी हनुमंत नेटके यांनी सांगितले.
शेतीच्या कामांना हळूहळू वेग
केतूर (ता. करमाळा) ः कोरोनामुळे लॉकडाऊननंतर काही प्रमाणात शिथीलता आल्याने शेतीच्या कामांनी हळूहळू वेग घेतला असल्याचे चित्र आहे. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात व इतर इतर भागातही गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने यावर्षी पाण्याची बऱ्यापैकी कमतरता नाही. बहुतांश ठिकाणी पाणीपातळी बऱ्यापैकी आहे. तरीही उजनी जलाशयाची पाणीपातळी मात्र 10 टक्क्यांवर येऊन ठेपली आहे.
हेही वाचा ः बिबट्यासदृश्य प्राण्याचा मोहोळ तालुक्यात धुमाकूळ
सध्या शेतीमध्ये नांगरणी बरोबरच बांधबंदिस्ती, शेती नीट करणे, जळाऊ लाकडे तोडणे, झाडेझुडपे काढणे, शेतातील दगडधोंडे बाजूला करणे, शेतीत गाळ भरणे अशी कामे शेतकरी करीत आहेत. शेतकरी ही सर्व कामे "सोशल डिस्टन्स" ठेवूनच करीत आहेत. लॉकडाऊन मुळे इतर कामांनी ब्रेक घेतला असला तरी शेतीकामांनी मात्र सध्या वेग घेतला आहे.
केतूर भागात खताचा तुटवडा
कोरोना संकट वरचेवर गडद होत असताना भाजीपाला व फळांचे दर कवडीमोल झाल्याने शेतकरी राजा पुरता घायाळ झाला आहे. या प्रकारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच लोकडॉउन मध्ये शेती कामांना शिथीलता दिल्याने शेती कामांना सध्या वेग आला आहे. मात्र करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील बागायती पट्ट्यात रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्या पुढे संकट निर्माण झाले आहे.
हेही वाचा ः शेतीच्या कामांना लाॅकडाऊनमधून मोकळीक
तालुक्याच्या उजनी भागाची पट्ट्यात रासायनिक खतांची दुकाने आहेत काही ठिकाणी खताची जंक्शन पॉईंट ही आहेत परंतु, या दुकानात खत उपलब्ध नसल्याने खत मिळणे अवघड झाले आहे. शेतात सध्या भाजीपाला व इतर पिकाबरोबरच ऊस पिकासाठी खताची गरज आहे. पिकांच्या वाढीसाठी खतांचा वापर केला जातो. शेतकऱ्यांना पाहिजे ती खते मिळत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या शेतकऱ्यांना युरिया, इफको, मिश्र खतांची गरज आहे परतु देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने खताची टंचाई झाल्याची खत विक्रेत्यांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील दुकानदारांना कृषी अधिकाऱ्यांनी सहकार्य करून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. महाराष्ट्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.