मोठी बातमी ! जीवनाश्‍यक वस्तू खरेदीची ठरली वेळ 

shoopkeeepper.jpg
shoopkeeepper.jpg

सोलापूर : लॉकडाउनमध्ये किरणा दुकानातून व भाजी मंडईतून जीवनाश्‍यक वस्तू खरेदीसाठी परवानगी मिळाली. मात्र, वस्तू खरेदीच्या नावाखाली शहरातील रस्त्यांवर ढिगभर वाहने फिरताना दिसत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता दिवसभर नव्हे तर दररोज सकाळी सहा ते दुपारी 12 वाजेपर्यंतच किराणा दुकाने, भाजी मंडई सुरु ठेवली जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी हा निर्णय घेतला असून राज्यभर असाच निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरातील किरणा दुकानांसह भाजी मंडई, भाजी विक्रेत्यांचा आढावा पोलिस आयुक्‍तांनी नुकताच घेतला. वस्तू खरेदीसाठी नागरिकांना दररोज सात तासांचा अवधी पुरेसा असल्याचा सूर या बैठकीत निघाला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असा निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले. पुणे, मुंबईसह राज्यभरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने खबरदारी म्हणून सोलापुरात हा निर्णय घेण्यात आला आहे. मॉर्निंग वॉकसाठी जावू नका म्हणून बजावले, तरीही नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी एकदाच करुन ठेवण्याऐवजी नागरिक वारंवार किरकोळ कारणांसाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे लॉकडाउन काळात नागरिकांना स्वयंशिस्त लागावी, जेणेकरुन सोलापूर कोरोनापासून कायम चार हात दूर राहिल, असा विश्‍वास पोलिस आयुक्‍तांनी व्यक्‍त केला. 


नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नवा निर्णय 
शहरातील मेडिकल, शासकीय कार्यालये (पाच टक्‍के कर्मचारी), खासगी दवाखाने, बॅंका आणि महापालिकेचे अत्यावश्‍यक सेवेसाठी नियुक्‍त केलेले चार हजार कर्मचारी व माध्यम प्रतिनिधीच रस्त्यांवर दिसतील. भाजीपाला, किरणा वस्तू खरेदीसाठी आता नागरिकांना स्वतंत्र वेळ निश्‍चित केली असून त्यावेळेतच त्यांनी वस्तू खरेदी कराव्यात. इतर वेळेस घराबाहेर पडल्यास संबंधितांचे वाहन जप्त करुन त्या व्यक्‍तीविरुध्द कारवाई केली जाईल. 
- अंकूश शिंदे, पोलिस आयुक्‍त, सोलापूर 

जप्त वाहनांची सहजासहजी सुटका नाहीच 
मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्‍तींची वाहने, विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांची वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. 22 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत सुमारे दोन हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाउन संपला तरीही ही वाहने सहजासहजी सोडली जाणार नसल्याचे पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी स्पष्ट केले. वाहनाचा विमा, पूर्वीचा दंड, पीयुसी, आरसी बूक अशा कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असून दंडाची रक्‍कम पूर्ण भरल्याशिवाय एकही वाहन सोडले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

...तर परवाना तीन महिन्यांसाठी निलंबीत 
लॉकडाउनमध्ये संचारबंदीचे उंल्लघन करणाऱ्या वाहनचालकांची वाहने जप्त केली जात आहेत. लॉकडाउन संपल्यानंतर वाहने सोडली जाणार असून त्यासाठी पोलिस आयुक्‍त कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र संबंधितांनी देणे बंधनकारक आहे. एखाद्या वाहनचालकांकडे कागदपत्रे अपूर्ण असतील अथवा कागदपत्रेच नसतील तर वाहन मालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबीत केला जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) संजय डोळे यांनी स्पष्ट केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com