विधान परिषदेतील भाजपचे बालेकिल्ले ढासळल्याने पराभव मान्य : प्रविण दरेकर 

प्रशांत काळे
Saturday, 5 December 2020

ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त रणजीतसिंह डिसले यांचा सत्कार करण्यासाठी मुंबईहून दरेकर बार्शी येथे आज सकाळी उपस्थित झाले. यावेळी अभिनव हायस्कूल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते. 

बार्शी(सोलापूर) ः राज्यात विधान परिषद,पदवीधर मतदारसंघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती आलेले असून भाजपचा सहा जागांवर महाविकास आघाडीने केलेला पराभव मान्य असून याचे आम्ही आत्मपरीक्षण करीत आहोत. आम्ही पुन्हा ताकदीने पुढे येऊ असे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केले. 

हेही वाचाः सोलापूर ग्रामीणमध्ये 151 नवे कोरोनाबाधित, तिघांचा मृत्यू 

ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त रणजीतसिंह डिसले यांचा सत्कार करण्यासाठी मुंबईहून दरेकर बार्शी येथे आज सकाळी उपस्थित झाले. यावेळी अभिनव हायस्कूल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते. 

हेही वाचाः छत्रपती संभाजी महाराज पुतळा सुशोभिकरणास सुरुवात 

यावेळी आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, अरुण बारबोले, सभापती अनिल डिसले उपस्थित होते. 
दरेकर पुढे म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत भाजपला 50 टक्के पेक्षा जास्त मतदान मिळाले आहे. पण शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस अशी तिघांची ताकद एकत्र आली.एवढ्या मोठ्या ताकदीने पुढे येतील असं वाटलं नव्हते. शिक्षक नसलेला माणूस शिक्षक मतदार संघात आमदार होतो हे लोकशाहीचे दुर्देव आहे. राष्ट्रवादीने या निवडणुकीत संस्थांचा वापर मोठ्या प्रमाणात केला. शिक्षणमंत्री, विभागीय आयुक्त प्रचारात उतरले होते. परंतु विसंवादाने भरलेले हे सरकार असून एकत्र रहावेच लागते आहे. आम्ही वाट पाहूनच आहोत. 
शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिली नाही. नुसत्या घोषणा करुन तोंडाला पाने पुसली आहेत. वीज बीलांचेही तेच केले पण परिवहन महामंडळाला मात्र एक हजार कोटींचे पॅकेज दिले जाते. अंतर्गत वाद असल्याने सर्व पातळीवर सरकार अपयशी आहे. 
मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न झुंजवत ठेवण्याचे काम या शासनाचे सुरु असून आगामी निवडणूकीत भाजपची ताकद दिसून येईल. हैद्राबाद महापालिकेत चार नगरसेवक होते ते 40 पर्यंत गेले आहेत, भाजपची ताकद वाढताना दिसत असून जनताच त्यांना दाखवून देईल असेही यावेळी प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.  

 
संपादन ः प्रकाश सनपूरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Defeat due to collapse of BJP's stronghold in Legislative Council: Pravin Darekar