तुळशी पावडर व आयुष काढा साहित्याची मागणी वाढली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

शहरामध्ये काही वनऔषधी व आयुर्वेदिक उपयोगाच्या वस्तूंच्या दुकानांमध्ये सध्या मोठी गर्दी होत आहे. नागरिकांना खरेदीसाठी सोशल डिस्टन्सचा नियम लावून सोय केली आहे. 

सोलापूरः शहरातील वनऔषधी व आयुर्वेदिक औषधी वस्तू दुकानांत कोरोना संकटामुळे तुळशी पावडर, तुरटी, आयुष काढ्याच्या साहित्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

हेही वाचाः शेतकऱ्यांना महाबीजच्या बियाणांची प्रतीक्षा 

शहरामध्ये काही वनऔषधी व आयुर्वेदिक उपयोगाच्या वस्तूंच्या दुकानांमध्ये सध्या मोठी गर्दी होत आहे. नागरिकांना खरेदीसाठी सोशल डिस्टन्सचा नियम लावून सोय केली आहे. 
कोरोना संकटाच्या काळात अचानक अनेक वस्तूंची मागणी वाढली आहे. एरवी या वस्तूंबाबत फारशी जागरूकता नसलेले नागरिक आवर्जून खरेदीसाठी येत आहेत. अनेकजण तर स्वतःच्या मोबाईलवर आयुष काढा व इतर औषधीबाबतची व्हिडिओ क्‍लिप दुकानदारांना दाखवून त्यातील औषधी वस्तूंची मागणी करीत आहेत. 
तुरटीची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. तुरटी पाण्यात टाकून ते पाणी स्नानाला वापरण्यासाठी खरेदी केली जात आहे. आयुष काढ्यासाठी सुंठ, काळी मिरी, दालचिनी, तुळशी पाने आदी वस्तूंचा उपयोग केला जात आहे. या वस्तूंची खरेदी जोरात केली जात आहे. त्यासोबत अनेकांकडे तुळशीची पाने पुरेशी नसतात. शहरात तुळशीची पाने पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. मात्र अनेक जण दररोज काढा घेत आहेत. त्यासाठी तुळशी पानाची पावडर खरेदी होत आहे. 
गुळवेल कांडी, रस मिळतो आहे. तुळसपान रस देखील विकला जात आहे. 

हेही वाचाः वाढीव 20 टक्के अनुदानाबाबत शिक्षक आमदार अपयशी 

याशिवाय अश्‍वगंधा, शतावरी, अंजीर, जर्दाळू व बदाम वस्तूची मागणी होत आहे. चहामध्ये अर्जुनसालचा वापर केला जातो. यासोबत च्यवनप्राश, गुलकंद विकला जात आहे. मधुमेहाच्या आयुर्वेदिक औषधीमध्ये जांभळासव, मधुनाश, जांभूळ, आवळारस, मधुचूर्ण खरेदीसाठी मधुमेहाचे रुग्ण येत आहेत. सध्या तरी आयुष काढ्याच्या साहित्याला वाढती मागणी आहे. मात्र या मालासाठी वाहतुकीचे अडथळे अद्याप दूर झालेले नाहीत. काहीजण भीमसेनी कापूर मास्कला लावत आहेत. सर्वच दुकानांवर अचानक आयुर्वेदिक साहित्याची वाढलेली मागणी पाहता दुकानदारांची देखील पुरवठ्यासाठी धावपळ सुरू आहे. 

ग्राहकामध्ये वाढलीय जागरुकता 
सध्या ग्राहक आयुष काढा व इतर आयुर्वेदिक पदार्थ तयार करण्याची व्हिडिओ क्‍लिप दाखवून साहित्य खरेदी करतात. आयुष काढ्याच्या साहित्याची खरेदी केली जात आहे. 
- भारत गोटे, गोटे वनऔषधी व आयुर्वेदिक वस्तू भांडार  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand increased of tulsi powder and ayush content