सोलापूर: केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे वित्त व नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन, मुंबई यांच्याकडे सोलापूरसाठीच्या बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाकरीता व सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार व उर्वरीत जमीन भुसंपादन करण्याकरीता 42 कोटी रूपये जमा झाले.
डिसेंबर 2008 मध्ये बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीस मंजूरी देण्यात आली. ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे सोलापूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर झाले. या विमानतळामुळे महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर वसलेल्या आणि सर्वच बाजूने महत्वपूर्ण असलेल्या सोलापूरला या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मंजूरीमुळे निश्चितच आणखी मोठे महत्व प्राप्त होणार होते. जगाच्या नकाशावर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे अत्यंत ठळकपणे सोलापूर समोर येताना खरया अर्थाने सोलापूरच्या औद्योगिक विकासाला ही चालना मिळणार होती.
भविष्यात सोलापूरचा चेहरा बदलणारया या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन देखील वेगाने झाले. आवश्यक तो मोबदला ही दिला गेला. 550 हेक्टर जमीन देखील संपादित झाली. भूसंपादनाच क्लिष्ट आणि किचकट प्रक्रिया तितक्याच वेगात आणि यशस्वीपणे पार पडली. तब्बल 1375 एकर इतकी जमीन या विमानतळासाठी संपादित करण्यात आली. इतक्या मोठया प्रमाणात भूसंपादन झाल्यानंतर अन् महत्वाची अशी प्रक्रिया पार पडल्यानंतर पुढिल कामांनाही वेग येण गरजेचे होते. 42 कोटी रूपये मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास कामांना वेग येणार आहे.
भूसंपादन व जमीन हस्तांतरणासाठी निधीचा वापर
माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नामुळे 42 कोटी रूपये मिळाले असून या निधीतून उर्वरीत 29 हेक्टरचे भूसंपादन करण्यात येणार आहे. भूसंपादन व वन विभागाची जमीन हस्तांतरण करण्यासाठी ही हा निधी वापरण्यात येणार आहे.
- सज्जन निचळ, व्यवस्थापक, सोलापूर बोरामणी आंतररष्ट्रींय विमानतळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.