वंचित बालकांना नविन कपडे व फराळाचे केले वाटप 

प्रकाश सनपूरकर
Sunday, 15 November 2020

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त डॉ.वैशाली कडुकर,भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत नामनिर्देशित केलेलं आयुर्वेद तज्ञ शिवरत्न शेटे, जिल्हा बालगृह तपासणी अधिकारी समीर सय्यद, उद्योजक केतन व्होरा, नगरसेवक गुरुषांत धुत्तरंगावकर, नरेन्द्र गंभीरे, भाग्यश्री वठारे, काशीनाथ भतगुणकी आदी मान्यवर उपस्थित होते. 

सोलापूरः बालदिन व दिवाळी निमित्त येथील प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून भिक्षा मागणाऱ्या, वंचित, उपेक्षित घटकातील 300 मुलांना दिवाळीच्या निमित्त नवीन कपडे, चप्पल, फराळाचे वितरण करण्यात आले. 

हेही वाचाः शेजारचे गेले दवाखान्यात, तितक्‍यात महाविद्यालयीन तरुणाने चोरले 75 ग्रॅमचे दागिने 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त डॉ.वैशाली कडुकर,भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत नामनिर्देशित केलेलं आयुर्वेद तज्ञ शिवरत्न शेटे, जिल्हा बालगृह तपासणी अधिकारी समीर सय्यद, उद्योजक केतन व्होरा, नगरसेवक गुरुषांत धुत्तरंगावकर, नरेन्द्र गंभीरे, भाग्यश्री वठारे, काशीनाथ भतगुणकी आदी मान्यवर उपस्थित होते. 

हेही वाचाः एकविस वर्षानंतर पहाटगाण्याशिवाय दिवाळी 

यावेळी बोलताना पोलिस उपायुक्त डॉ.वैशाली कडूकर यांनी सांगितले की, समाजातल्या वंचित उपेशी,भिक्षा मागणाऱ्या मुलांना भीक न देता शिक्षण, संस्कार देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे प्रत्येकाचे काम आहे.या कामी सोलापूर मध्ये प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून कार्य केले जाते त्या साठी समाजातील प्रत्येकाने जमेल तसा हातभार लावणं गरजेचं आहे असे सांगितले. बालदिनाच्या निमित्त मुलांना दिवाळीचा फराळ आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या सचिव अनु मोहिते यांनी दिली. कार्यक्रमासाठी गोविंद तिरणगरी, सचिन जगताप, सिद्रय्या पाटील, मुकेश जामदार, रोहित कोळेकर, ओम साळुंखे, प्रसाद बिराजदार आदींनी परिश्रम घेतले.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of new clothes and blankets to deprived children