वडाच्या झाडाचे औषधी उपयोग तुम्हाला माहित आहेत काय ?

baniyan tree.jpg
baniyan tree.jpg
Updated on

सोलापूरः वडाच्या झाडाची स्त्रियांकडून सामुहिक पूजा करण्याचा प्रघात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार प्राचीन काळापासून आहे. वडाच्या झाडामध्ये असलेले अनेक औषधी उपयोग बघता असे लक्षात येते की विशेष करून स्त्री वर्गासाठी वड हा वृक्ष अत्यंत आरोग्यदायी असा आहे. 


आयुर्वेदाने वर्णन केलेले वडाचे औषधी उपयोग सर्वांनीच वटपौर्णिमेच्या निमित्ताने माहिती करून घ्यायला हवेत. वडाचा औषधी गूण हा जड गुणाने कोरडा असतो. त्याचप्रमाणे तो थंड गुणाचा म्हणून प्रसिद्ध आहे. तुरट रस म्हणजे संस्कृतमध्ये याला कषाय असे म्हणतात ह्या तुरट चवीमुळे अनेक प्रकारचे औषधी गुण या वडामध्ये असतात. 

शरीरातील तीन दोषांत पैकी कफ आणि पित्त या दोन दोषांचे शमन या वडा मुळे होते. स्त्रियांच्या अनेक आजारांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने औषध म्हणून उपयोगी पडतो. मासिक पाळीच्या अनेक विकारांमध्ये उपचारासाठी वडापासून तयार केल्या औषधीचा उपयोग करतात. वडाचा तुरट रस आणि थंड गुणधर्म यामुळे स्त्रियांच्या या दोन्ही विकारात याचा अतिशय चांगला उपयोग होतो. अर्थातच त्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्‍यक ठरतो. 

वडाच्या खोडाची साल, पाने, अंकुर व पानांचे चूर्ण अशा विविध स्वरूपांत मध्ये औषधी तयार होते. त्यांचा उपयोग आरोग्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने होताना दिसतो. वडाच्या चिकाचा उपयोग विविध प्रकारच्या संधीवातावर उपचारासाठी करतात. तसेच आमवातामध्ये वडाचा चीक तसेच वडाची पाने ही लेप स्वरुपात उपयुक्त ठरतात. स्त्रियांमध्ये केस गळण्याचे प्रमाण बऱ्याचदा आढळते.

केस गळण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये केसांना रोज तेल न लावणे, आहारामध्ये तिखट आंबट खारट पदार्थ जास्त प्रमाणात घेणे, रात्रीचे जागरण, अतिशय चिंता करणे, चिडचिड करणे अशी अनेक कारणे केस गळतीला कारणीभूत ठरतात. यावर वडाच्या पारंब्यांनी सिद्ध केलेले तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल केसांना वरून लावण्यासाठी वापरतात. तसेच या तक्रारीसाठी पोटातूनही वैद्यकीय सल्ल्याने औषधे घ्यावी लागतात. विशेष करून केशवर्धक आणि पित्तशामक औषधांचा केसगळतीवर चांगला उपयोग होतो. 


गर्भिणी मध्ये होणारा वडाच्या अंकुराचा उपयोग हा खूपच चांगला आहे. त्याचा उपयोग गर्भाच्या निरोगी आणि उत्तम वाढीसाठी केला जातो. झाडापासून पंच्चवलकल चूर्ण, पंच्चवलकल कशाय त्याचबरोबर वट जतदी तेल अशी विविध प्रकारची औषधे तयार केली जातात. त्यांचा उपयोग योग्य सल्ल्यानुसार अनेक व्याधींमध्ये हे केला जातो. याप्रमाणे स्त्रियांच्या अनेक विकारांमध्ये हे उपयुक्त असलेले हे वडाचे झाड नक्कीच पूजनीय आहे हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे.

 वडाचे औषधी उपयोग माहिती करून घ्यायला हवेत. 

वटपौर्णिमेच्या निमित्ताने याचे महत्त्व आपण समजून घेऊन नित्यनेमाने दैनंदिन जीवनात आपण या वडाचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि त्याचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. 

वैद्य विजय कुलकर्णी आयुर्वेद चिकित्सक 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com