
सोलापूर : बेडशीट, प्लेन टॉवेल, नॅपकिन व वॉलहॅंगिंगचे विविध प्रकार त्याचप्रमाणे कोकणी सिल्क, आर्ट सिल्क, रेग्युलर साडी ही सोलापुरी हातमाग विणकामाची वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने आहेत. मात्र लॉकडाउनमुळे या उत्पादनांना मागणी नसल्याने उत्पादक व कामगारांना मोठ्या प्रमाणात नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. घरगुती व्यवसाय असल्याने काही प्रमाणात वॉलहॅंगिंगची उत्पादने विक्रीसाठी तयार आहेत, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध यात्रा- जत्रा रद्द झाल्याने उत्पादकांचा हिरमोड झाला आहे.
हेही वाचा : जुलैपर्यंत 100 टक्के पीक कर्ज वाटप करा
येथे खड्डा मागावर नऊवारी कोकणी सिल्क, आर्ट सिल्क व सहावारी रेग्युलर सिल्क साड्या विणल्या जातात. लग्न सराईत सोलापूरच्या कोकणी सिल्क साड्यांना देशभरातून मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे फ्रेम हातमागावर बेडशीट, प्लेन टॉवेल, नॅपकिन व वॉलहॅंगिंगचे विविध प्रकार घेतले जातात. या सर्व उत्पादनांना देश-विदेशातून मागणी असते. वॉलहॅंगिंगची उत्पादने तर ऑनलाइन विक्री होतात. मात्र लॉकडाउनमध्ये कच्चा मिळत नाही व डाइंग युनिटही बंद असल्याने उत्पादने बंद होती. जी काही उत्पादने झाली ती आषाढ महिन्यात सुरू होणाऱ्या विविध यात्रा-जत्रांमध्ये विकली जातील, अशी आशा होती, मात्र सर्व यात्रा रद्द झाल्या.
येथील वॉलहॅंगिंगमधील कटवर्क, फिगर्स, शबनम बॅग, मोबाईल बॅग आदी उत्पादनांना महाराष्ट्रासह ओरिसा, कोलकता, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून मागणी असते. मात्र लॉकडाउन शिथिलीकरणानंतरही आधीच्या उत्पादनांची विक्री न झाल्याने खरेदीदारांकडून नवीन मागणी नाही. मागणी नसल्यामुळे दरमहा एक कोटीची उलाढाल असणाऱ्या हातमाग उद्योजकांना भविष्याची चिंता लागली आहे.
हेही वाचा : आता कोचिंग क्लासेसही ऑनलाइन
एम्पोरिअममार्फत हातमाग उत्पादनांची विक्री होते. तसेच देशातील विविध राज्यांत भरणाऱ्या प्रदर्शनांमध्ये व यात्रा- जत्रांमध्ये स्टॉल लावून विक्री केली जाते. मात्र लॉकडाउनमुळे प्रदर्शने बंद झाली तसेच भुवनेश्वरची जगन्नाथ रथयात्रा व पंढरपूरची आषाढी वारी यासह आषाढ महिन्यात होणाऱ्या विविध जत्रा रद्द झाल्या आहेत. नवीन ऑर्डरही हातात नाही. उत्पादनांची विक्री कशी करायची, याबाबत चिंता लागली आहे.
- राजेश सादूल, वॉलहॅंगिंग उत्पादक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.