शेतकऱ्यांना कर्जमाफी सोबत पीक कर्जाची तातडीने गरज भागवावी 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 25 जून 2020

कोरोना व लॉकडाऊनच्या काळात शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तसेच बॅंकेत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्ज माफी करण्याची व नियमित कर्जदारांना प्रोत्साहन अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. मात्र कर्जमाफीची प्रक्रिया अद्यापही सुरू असल्याने अनेक शेतकरी नवीन पीक कर्जापासून वंचित राहिले आहेत.

सांगोला(सोलापूर): लॉकडाउनच्या काळात शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सध्या खरिपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अपूर्ण असलेली कर्जमाफीची प्रक्रिया राबवावी. तसेच पीक कर्ज देण्यासाठी बॅंकांना आदेश द्यावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान सेलच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. 

हेही वाचाः श्री विठ्ठल रुक्‍मिणी मुर्तीवर वज्रलेपाची प्रक्रिया पूर्ण 

कोरोना व लॉकडाऊनच्या काळात शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तसेच बॅंकेत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्ज माफी करण्याची व नियमित कर्जदारांना प्रोत्साहन अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. मात्र कर्जमाफीची प्रक्रिया अद्यापही सुरू असल्याने अनेक शेतकरी नवीन पीक कर्जापासून वंचित राहिले आहेत. दोन लाखाच्या वर कर्ज असणारे आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा आदेश निघाला नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

हेही वाचाः नियमीत कर्जफेड करणाऱ्या बचतगटांमागे बॅंकांनी कर्जवसुलीचा लावलाय तगादा 

22 मे रोजी शासनाने कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज शासनाचे नावे करून शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध द्यावे असे आदेश दिले होते. मात्र बॅंकांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असून राष्ट्रीयीकृत बॅंका शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दारातही उभे करत नसल्याचे चित्र दिसत आहे. तसेच डाळिंब पिकाला सुद्धा इतर पिकांप्रमाणे नुकसान भरपाई शासनाने मंजूर करून तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढावे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या कोरडवाहू जमिनीसाठी 25 हजार व फळबागांना 50 हजार देणार हे सरकार विसरून गेले आहे. 
अनेक जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांनी विमा हप्ता भरून घेतला नसल्याने हजारो शेतकरी विमा संरक्षण पासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात दिलासा देण्यासाठी बॅंकेतून पीककर्ज द्यावे व कर्जमाफीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान सेलच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरचे निवेदन सांगोला तहसील कार्यालयात देण्यात आले. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशमुख, सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, उपाध्यक्ष नंदकुमार येलपले आदी उपस्थित होते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers should be given urgent need for crop loan along with loan waiver